डोंबिवली प्रतिनिधी - पैसे परत करत नसल्याने एका व्यक्तीला डांबून ठेवत त्याच्या पत्नीकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोराला डोंबिवली(Dombivli
डोंबिवली प्रतिनिधी – पैसे परत करत नसल्याने एका व्यक्तीला डांबून ठेवत त्याच्या पत्नीकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोराला डोंबिवली(Dombivli) तील टिळक नगर पोलिसांनी(Tilak Nagar Police) अटक केली आहे. अतुल व्यापारी(Atul Traders) असे सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अजय जाधव(Ajay Jadhav) असे खंडणी मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे. एका व्यवहारात अजयने दिलेले 2 लाख 80 हजार रुपये अतुल व्यापारी हे परत करत नसल्याने त्यांचे अपहरण करुन मारहाण केली. अजय जाधव हा रेल्वेत मॅकेनिक(Mechanic in Railways) आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी व्यापारी यांच्या पत्नीने टिळक नगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी मागणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडून अतुल यांची सुखरूप सुटका केली आहे.
COMMENTS