नवी मुंबईत 363 कोटींचे हेरॉईन जप्त

Homeताज्या बातम्या

नवी मुंबईत 363 कोटींचे हेरॉईन जप्त

नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये मोठया प्रमाणावर हेरॉईन जप्त केल्यानंतर नवी मुंबईत देखील गुन्हे शाखेने तब्बल 363 कोटींचे हेरॉईन जप्त केले आहे

Ahmednagar : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची लोकमंथन कार्यालयास भेट (Video)
आमच्यावर अन्याय करा तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो : सुजय विखे
ज्ञानवापी मशीद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा

नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये मोठया प्रमाणावर हेरॉईन जप्त केल्यानंतर नवी मुंबईत देखील गुन्हे शाखेने तब्बल 363 कोटींचे हेरॉईन जप्त केले आहे. दुबईतून आलेल्या एका कंटेनरमधून हे हेरॉईन पोलिसांनी जप्त केले आहे. एवढया मोठया किंमतीचे हेरॉईन नेमके कुणी आणि कशासाठी आणले होते, याचा पोलिस शोध घेत आहे.
बाजारात तब्बल 363 कोटी रुपय किंमत असलेले हे 73 किलो ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. दुबईतून आलेल्या एका कंटेनरमध्ये हे हिरॉईन पोलिसांना सापडले आहे. 363 कोटी रुपये किंमतीचे हे हेरॉईन जेएनपीटी येथे असलेल्या गोडावून मधून हे हेरॉईन जप्त करण्यात आले. डिसेंबरमध्ये हा कंटेनर दुबईहून आला होता.

COMMENTS