मनसुख हिरेन मृत्यूचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करा : सत्र न्यायालय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसुख हिरेन मृत्यूचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करा : सत्र न्यायालय

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडून एनआयएला हस्तांतरित केला जावा असे निर्देश ठाण्यातील सत्र न्यायालयाने आज, बुधवारी दिले.

महायुतीतील नाराजीनाट्य !
धक्कादायक, आरोपीने दिली 9 गुन्ह्याची कबुली
शिवसेना आमदाराला ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडून एनआयएला हस्तांतरित केला जावा असे निर्देश ठाण्यातील सत्र न्यायालयाने आज, बुधवारी दिले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यास तयार नव्हती. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देऊन देखील महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करत नसल्याची तक्रार एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात केली होती. एनआयएची ही तक्रार मान्य करत सत्र न्यायालयाने एटीएसला हे आदेश दिले आहेत. एटीएसने आत्तापर्यंत केलेल्या तपासाची कागदपत्रे, पुरावे आणि त्यासोबतच अटक करण्यात आलेले दोन आरोपी, निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर, या दोघांना देखील एनआयएच्या ताब्यात देण्यात यावं, असं देखील न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. या प्रकरणातील महत्त्वाची कडी ठरलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे याला एनआयएने यापूर्वीच अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात अटक केली आहे. आता मनसुख हिरेन प्रकरण देखील एनआयएकडे आल्यामुळे या दोन्ही प्रकरणांवर सचिन वाजेची चौकशी करण्याचा मार्ग एनआयएसाठी मोकळा झाला आहे. एटीएसने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाजेनीच विनायक शिंदे या पॅरोलवरील आरोपीचा वापर करून गुन्ह्यामध्ये सहभाग ठेवल्याचे स्पष्ट केले होते. वाजेच्या सांगण्यावरूनच विनायक शिंदेने गुन्ह्यात वापरलेली सिमकार्ड खरेदी करून ती इतरांना दिली होती. त्यानुसार या प्रकरणात अजून काहींनी अटक होण्याची शक्यता एटीएसने वर्तवली होती.

COMMENTS