शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदें (Eknath Shinde) ना पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस(Ramdas Tadas) यांनी केला आहे . शिव
शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदें (Eknath Shinde) ना पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस(Ramdas Tadas) यांनी केला आहे . शिवसेना आमदारांपाठोपाठ अनेक खासदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू असतानाच तडस यांनी थेट आकडाच सांगितल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे . भाजपचे खासदार रामदास तडस(MP Ramdas Tadas) अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र प्रांतिक तैलीक(Maharashtra Provincial Oil) महासभेचा नाशिक विभागीय पदाधिकारी मेळावा शिर्डी(Shirdi) येथे संपन्न झाला . या मेळाव्यासाठी रविवारी सायंकाळी खा. तडस शिर्डीमध्ये आले होते . या देशात ओबीसी ५२ टक्के असून त्यातही तेली समाज तेरा टक्के असल्याने या समाजाला न्याय मिळण्यासाठी आमचा लढा सुरू आहे . ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याकडे केली असल्याचे खा. तडस यांनी सांगीतले .

COMMENTS