Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड येथील 25 घरांना आग; सिलेंडर स्फोटाने शहर हादरले

कराड / प्रतिनिधी : कराड बसस्थानकापासून जवळच असलेल्या परिसरातील वस्तीला मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत चार सिलेंडर

प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनेलची एकहाती सत्ता : सर्व 21 जागांवर विजय
ए. आर. पवार म्हणजे कोण रं भाऊ : रमाकांत डाके
तहसीलदारांची राजपथ इन्फ्रावर धडक कारवाई: आठ कोटी रॉयल्टी थकविल्याने वाहनांसह मशिनरी सील

कराड / प्रतिनिधी : कराड बसस्थानकापासून जवळच असलेल्या परिसरातील वस्तीला मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह कराड न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतू, या भयावह आगीत 24 घरे जळून खाक झाली. या घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत.
कराडमधील टाऊन हॉल शेजारील व बापूजी साळुंखे पुतळ्याच्या पूर्वेकडील बाजूस असणार्‍या एका वस्तीस मध्यरात्री अचानक आग लागली. त्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने अधिक रौद्ररूप धारण केले. आगीमध्ये त्या परिसरातील संबंधित महिलांची घरे आणि त्या परिसरातील व्यावसायिकांचे दुकान गाळे जळून खाक झाले आहेत. या आगीत तीन महिला जखमी झाल्या आहेत.
आगीची माहिती न्यायालय परिसरात असणार्‍या होमगार्डला मिळाल्यावर, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन काही महिलांना बाहेर काढण्यास मदत केली. दरम्यान, घटनास्थळी पालिकेचा अग्निशमन बंब आणि कृष्णा साखर कारखान्याचा अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात आली. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर आग विझवण्यात यश आले. दरम्यान, संबंधित महिलांना येथील पालिका शाळा क्रमांक 3 मध्ये तात्पुरत्या निवार्‍याची सोय करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव, फारुख पटवेकर, विजय यादव व सहकार्‍यांनी भेट देऊन तेथील पुढील कार्यवाही सुरू केली. दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

COMMENTS