Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप आमदार जयकुमार गोरेंचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला

सातारा / प्रतिनिधी : मृत व्यक्तीच्या जागी बोगस व्यक्ती उभी करून जमीन खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी माण-खटाव मतदारसंघाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व व

मिलिटरी आपशिंगेच्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू
लोणंद येथील अतिक्रमणे हटविण्याबाबत सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस
इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची हमरी-तुमरी

सातारा / प्रतिनिधी : मृत व्यक्तीच्या जागी बोगस व्यक्ती उभी करून जमीन खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी माण-खटाव मतदारसंघाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार आणि जयकुमार गोरे यांचा मुंबई हायकोर्टाने जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. दरम्यान, येत्या दोन आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मुदतही न्यायालयाने दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आ. गोरे यांना तात्पुरते अटकेपासून संरक्षण दिले होते. तोपर्यंत आमदार गोरेंना अटक न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने सातारा पोलिसांना दिले होते. या प्रकरणाची 9 जून रोजी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी झाली होती. आज सकाळी या अर्जावर सुनावणीचा आदेश देण्यात आला असून जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
मुंबईत उच्च न्यायालयात रेवते-ढेरे पाटील यांच्या कोर्टात सुनावणी झाली. त्याचा आदेश आज सकाळी हायकोर्टाने दिला. अ‍ॅड. मनोज मोहिते, अ‍ॅड. वैभव आर गायकवाड, अ‍ॅड. डी. एस. माळी यांनी फिर्यादीची बाजू मांडली. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 20 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आ. जयकुमार गोरे यांना निवडणुकीमुळे मुदत मिळाली आहे. 2 आठवड्यात सुप्रीम कोर्टात अपील करावे लागणार आहे.
वडूज जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी धाव घेतली होती. मागासवर्गीय समाजातील मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेंच्या अटकपूर्व जामिनावर काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली.
मायणी, ता. खटाव येथील एका जमिनीसंदर्भात बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (विरळी), महेश पोपट बोराटे (बिदाल) यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात एका तलाठ्याचाही समावेश असून तो फरार आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी पोलिसांत फौजदारी तक्रार दिली आहे.

COMMENTS