HomeUncategorized

वादळी वार्‍याने आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाले; लाखो रुपयांचे नुकसान

कुडाळ : वादळी वार्‍याने आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुडाळ : बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास

सातारा जिल्ह्यात ओमिक्रॉनचे तीन रुग्ण; युगांडामधून फलटणमध्ये आलेल्या चौघापैकी तिघे बाधित
पाचगणी बसस्थानकात पुन्हा लाल परी प्रवाशांच्या सेवेत रुजू
शेतकर्‍यांनो राज्य नको राज्यकर्ते बदला : रघुनाथदादा पाटील याचे आवाहन

कुडाळ : बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह वार्‍याचा जोरदार प्रवाह सुरू होता. यात ज्ञानशक्ती शिक्षण संस्था रामवाडीच्या आमृतवाडी, ता. वाई स्थित आनंददायी माध्यमिक निवासी आश्रमशाळा अमृतवाडी, ता. वाई या शाळेचे छत पत्रे अँगलसह उचकटून उडून इतरत्र पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शाळा सुरू होण्यासाठी चार दिवस बाकी आज असतानाच अचानक मान्सूनपूर्व वादळी पावसाने निसर्गाच्या संहारात क्षणार्धात शाळेचे होत्याचे नव्हते झाले. वादळी वार्‍यामुळे परिसरात काही भागातील घरावरील पत्रे उडाल्याची घटना घडल्या आहेत. ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे पडली असून काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने विजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

COMMENTS