Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकी-चारचाकी कारची समोरासमोर धडक; एकजण जागीच ठार

शिराळा / प्रतिनिधी : चांदोली-शेडगेवाडी या मार्गावर मोटारसायकल आणि चारचाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात मोटर सायकलस्वार सचिन

तीन वर्षानंतर मार्डी मार्गे खुंटबावला एसटी बस सुरू; महिला अधिकार परिषदेच्या मागणीला यश
25 वर्षाच्या युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून
कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठाणे-पालघर जिल्ह्यातील प्रश्‍न प्रामुख्याने सोडवू : चैतन्य दळवी

शिराळा / प्रतिनिधी : चांदोली-शेडगेवाडी या मार्गावर मोटारसायकल आणि चारचाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात मोटर सायकलस्वार सचिन लक्ष्मण विगंकर (वय 27) हा तरुण जागीच ठार झाला.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, चांदोली-शेडगेवाडी रस्त्यालगत असलेल्या काळे घर या वस्तीसमोर भरधाव चार चाकीस मोटर सायकलने जोराची धडक दिल्याने मोटर सायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी 11.30 च्या सुमारास झाला अपघात एवढा भीषण होता की, मयत विंगकर याचा मृतदेह जवळपास शंभर मीटर अंतरावर फेकला गेला होता. शित्तुर वारुण, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर येथील सचिन विंगकर हा कामा निमीत्त शेडगेवाडीच्या दिशेने जात असताना मोटारसाय भरधाव वेगात विरुध्द दिशेने चालवत नेवुन समोरुन शेडगेवाडीहुन चांदोलीच्या दिशेने येणार्‍या नेक्सॉन कारला समोरासमोर धडक दिल्याने मयत विंगकर याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. दरम्यान, या अपघाताची माहिती फिर्यादी वसंत पाटील सरपंच मणदुर, ता. शिराळा यांनी कोकरुड पोलीस ठाण्यात फोन वरुन दिली. पुढील तपास सपोनि ज्ञानदेव वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

COMMENTS