देशभरात ईद उत्साहात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशभरात ईद उत्साहात

नवी दिल्ली : देशभरात मंगळवारी ईदेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. भारतात आज ईद साजरी केली जात आहे, मात्र अनेक देशांमध्ये एक दिवस आधी चंद्रद

मुंबईत साडेपाच लाख घरे रिकामी
अकोल्यात 132 दिव्यांगांनी केले घरातून मतदान
आम्ला गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला

नवी दिल्ली : देशभरात मंगळवारी ईदेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. भारतात आज ईद साजरी केली जात आहे, मात्र अनेक देशांमध्ये एक दिवस आधी चंद्रदर्शन झाल्यामुळे काल ईद साजरी करण्यात आली. भारतातील सर्व मशिदी आणि इदगाहांमध्ये मंगळवारी सकाळी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईद उल फित्रला मिठी ईद असेही म्हणतात. या दिवशी, मुस्लीम लोक त्यांच्या घरात शेवया आणि खीरसह अनेक उत्कृष्ट पदार्थ बनवतात. तसेच एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आज सकाळी ऐतिहासीक जामा मशिदीत ईदची नमाज अदा करण्यात आली. यासोबतच लखनऊ, हैदराबद, पटना, कानपूर, मुंबई, बंगळुरू, अमरावती, श्रीनगर इत्यादी शहरांमध्ये ईदेचा उत्साह दिसून आला.

COMMENTS