अखेर महिला अत्याचारप्रकरणी गोविंद मोकाटेला झाली अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर महिला अत्याचारप्रकरणी गोविंद मोकाटेला झाली अटक

अहमदनगर/प्रतिनिधी : मागासवर्गीय महिलेवर अत्याचाराच्या गुन्ह्यात पसार असलेला आरोपी नगर पंचायत समितीचा माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे (रा. इमामपूर, ता.

कोपरगावच्या जनतेला न्याय मिळाला – नगराध्यक्ष वहाडणे
Sangamner : थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न
विहिरीने गिळंकृत केली 87 पोते सोयाबीन व इतर साहित्य

अहमदनगर/प्रतिनिधी : मागासवर्गीय महिलेवर अत्याचाराच्या गुन्ह्यात पसार असलेला आरोपी नगर पंचायत समितीचा माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे (रा. इमामपूर, ता. नगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मोकाटे याच्याविरुद्ध डिसेंबर महिन्यात तोफखाना पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात झाला होता. नगरच्या एका उपनगरात राहणार्‍या महिलेने याबाबत फिर्याद दिली होती. मोकाटे याने 2018 मध्ये फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. नंतर मेसेज करून भेटायचे असल्याचे सांगितले. या महिलेच्या एका नातेवाईकाकडे फिजिओथेरपी घेण्याच्या बहाण्याने वेळोवेळी उपनगरात येत राहिला. एक दिवस पती घरी नसल्याचे पाहून त्याने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर पतीला व मुलांना ठार मारून टाकण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पीडित महिलेने दिली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी मोकाटे हा पसार होता. त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मंगळवारी त्याने तोफखाना पोलिसात आत्मसमर्पण केले.

COMMENTS