Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राचार्याच्या मुलीसाठी फोडला प्रात्याक्षिकाचा पेपर

दोन शिक्षकांनीच लिहून दिला पेपर - राहुरी तालुक्यातील प्रकार

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ना त्या कारणाने सातत्याने प्रकाश झोतात राहत अस

हनीट्रॅप ब्लॅकमेलिंग जाळ्यात अडकला क्लासवन अधिकारी ; नगर तालुका पोलिसात दुसरा गुन्हा दाखल, 3 कोटीची मागणी
महापुरूषांचे विचार कृतीत येणे ही काळाची गरज : विवेक कोल्हे
हिंदू दलितांच्या लोकसंख्यानिहाय आरक्षणाकरीता लढा उभारणार – आ.नरेंद्र भोंडेकर

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील शिक्षण संस्थेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ना त्या कारणाने सातत्याने प्रकाश झोतात राहत असते. गेल्या काही वर्ग खोल्यात मुलींचे मोठ्या प्रमाणात अंर्तवस्त्रे सापडल्याने मोठा गदारोळ झाला होता. काल पुन्हा याच विद्यालयात उच्च माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शाखेचे बोर्डाच्या प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षेदरम्यान या विद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य यांच्या मुलीसाठी दोन शिक्षकांनी कॉफी (नक्कल) केल्याचा प्रकार उघड झाल्याने शैक्षणिक  वर्तुळात खळबळ उडाली आहे. तत्कालीन प्राचार्याच्या मुलीसाठी काँपी करणार्‍या शिक्षकांवर व विद्यालयाच्या प्राचार्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा काही सामाजिक संघटनांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिला आहे.
              राहुरी तालुक्यातील ज्या विद्यालयात विज्ञान शाखेत प्रात्यक्षिक परीक्षेत काँपी करण्याचा प्रकार उघड झाला आहे.त्याच विद्यालयात काही महिण्यापुर्वी विद्यालयाच्या वर्ग खोल्यात मुलींचे अंर्तवस्ञे मोठ्या प्रमाणात सापडल्याने खळबळ उडाली होती.त्या नंतर या विद्यालयाचे प्राचार्य यांची बदली करण्यात आली. सध्या बारावी विज्ञान शाखेची प्रात्यक्षिक परीक्षा सुरु आहे.तत्कालीन प्राचार्याची मुलगी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होण्यासाठी विद्यालयातील दोन शिक्षक त्यामध्ये एक ज्या विषयाचे प्रात्यक्षिक आहे त्या विषयाचे शिक्षक दुसरे विनाअनुदानित तुकडीवर काम करणारे शिक्षक या दोघांनी प्राचार्य यांच्या कस्टडीत असलेली प्रश्‍नपत्रिका ताब्यात घेवून प्रात्यक्षिक परीक्षेपूर्वीच तत्कालीन प्राचार्य यांच्या मुलीचे प्रात्यक्षिक पेपर लिहण्यात आला होता. हा सर्व प्रकार विद्यालयात समजल्यानंतर एका सामाजिक संघटनेने गटशिक्षणाधिकारी यांना भ्रमणभाषवरुन या घटनेची माहिती दिली. तातडीने चौकशी न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.             

 तत्कालीन प्राचार्य यांनी या विद्यालयातील विषय शिक्षकासह अन्य एका शिक्षकास हाताशी धरुन प्रात्यक्षिक पेपर लिहुन घेतला असल्याची चर्चा शेक्षणिक क्षेञात चालू आहे. संघटनेच्या तक्रारी वरुन गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन व विस्तारधिकारी अर्जुन गारुडकर त्या विद्यालयात धाव घेवून प्रात्यक्षिक पेपर ताब्यात असलेले प्राचार्य व ज्यांनी शिक्षकाने प्रात्यक्षिक पेपर फोडला आणि ज्या शिक्षकाने प्रात्यक्षिक पेपर लिहला त्या शिक्षकांची चौकशी करुन धारेवर धरले.तत्कालीन प्राचार्य यांनी संबधित शिक्षकांना हाताशी धरुन प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) पेपर फोडला आहे.                          याबाबत गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन  यांच्याशी सामाजिक संघटनेने संपर्क साधला असता ते म्हणाले की,माझ्या सहकार्‍यासह या विद्यालयात चौकशी आलो आहे. चौकशीतुन काय वास्तव समोर येते त्यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत.

तक्रारीत तथ्य आढल्यास चौकशी करणार ः गारुडकर
राहुरी तालुक्यातील एका शाळेत बारावी विज्ञान शाखेचा प्रात्यक्षिक पेपर फुटल्याची तक्रार मोबाईलवरून प्राप्त झाली होती. त्यानुसार त्या शाळेत जावून गटशिक्षणाधिकारी गोरक्षनाथ नजन व विस्तारधिकारी अर्जुन गारुडकर आम्ही दोघांनी मिळून चौकशी केली परंतू तथ्य आढळले नाही. संबधित तक्रार करणार्‍या संघटनेकडून पुरावे मागवून घेतले आहेत. ते पुरावे आल्यानंतर पुन्हा एकदा चौकशी करुन तसे काही आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे विस्तारधिकारी अर्जुन गारुडकर यांनी सांगितले.

शिक्षक असे, तर विद्यार्थ्यांनी काय करावे?
शिक्षकांना सर्व विद्यार्थी समान असतात सर्वांना समान शिक्षण देण्याचे काम शिक्षक करतात परंतू येथे मात्र तत्कालीन प्राचार्याच्या मुलीसाठी चक्क दोन शिक्षकाने प्रात्यक्षिक पेपर फोडून लिहुन दिला आहे. शिक्षकच विद्यार्यांचे पेपर लिहु लागले तर इतर विद्यार्थ्यांनी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्‍न या निमित्ताने पुढे येत आहे.त्या आजी माजी प्राचार्य व शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

COMMENTS