इस्लामपूर / प्रतिनिधी : बहे (ता. वाळवा) येथील काल घडलेल्या घटनेतील गंभीर जखमी सचिन तानाजी पाटील (रा. बहे, ता. ऊाळवा) यांचा कोल्हापूर येथील खाजगी
इस्लामपूर / प्रतिनिधी : बहे (ता. वाळवा) येथील काल घडलेल्या घटनेतील गंभीर जखमी सचिन तानाजी पाटील (रा. बहे, ता. ऊाळवा) यांचा कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. यातील संशयित आरोपी विशाल उर्फ लाल्या विजय भोसले याला पोलिसांनी कालच ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयात आज हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पैशाच्या देवाण-घेवाणीवरून जुन्या वादाच्या कारणावरून सचिन पाटील व विशाल उर्फ लाल्या भोसले यांच्यात वाद सुरू होता.
काल दुपारीही त्यांच्यात वाद झाला होता. तो महेश घबक व सुनील अनुसे यांनी मध्यस्ती करून सोडवला. त्यानंतर विशाल उर्फ लाल्या हा तिथून निघून गेला होता. त्यानंतर महेश घबक, सुनील अनुसे व सचिन पाटील तेथेच असलेल्या शाळेच्या ओट्यावर झोपले. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विशाल उर्फ लाल्या तेथे परत आला व जवळच असलेला मोठा दगड घेऊन सचिनच्या डोक्यात घातला. फरशीवर काहीतरी पडल्याचा जोराचा आवाज झाल्याने सुनील व महेश यांना जाग आली. विशाल उर्फ लाल्या भोसले याने खून करण्याच्या उद्देशाने सचिन याच्या डोक्यात दगड घातला. पुन्हा दगड डोक्यात घालताना महेश व सुनील यांनी त्याला अडवले. त्यानंतर विशाल उर्फ लाल्याने तेथून पलायन केले. सचिन पाटील याला डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा डोक्याला गंभीर इजा, आल्याने उपचारादरम्यान सचिन याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद सुनील बाळासो अनुसे (रा. हुबालवाडी) यांनी इस्लामपूर पोलिसांत दिली असून खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पुढील तपास इस्लामपूर पोलीस करत आहेत.
COMMENTS