Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भविष्यात सत्ताबदलात महाडिक कुटूंबाचा मोलाचा वाटा : देवेंद्र फडणवीस

कर्ज नसलेला पहिला दूध संघमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाळवा-शिराळा दूध संघाचे पहिले सभासद झाले. ते सभासद झाल्यानंतर आमच्या संघास भरभराट सु

विकासकामांचे फुगे उडवणार्‍या आमदारांना घरी बसवा : निशिकांत भोसले-पाटील
महिला वकिल यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर सातारा जिल्ह्यातील वातावरण तापले

कर्ज नसलेला पहिला दूध संघ
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाळवा-शिराळा दूध संघाचे पहिले सभासद झाले. ते सभासद झाल्यानंतर आमच्या संघास भरभराट सुरू झाली. दूध संकलन 25 हजाराच्या घरात पोहचले तर संघाची इमारत ही पुर्ण झाली. कोणतेही कर्ज नसणारा हा पहिला दूध संघ आहे. याचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे.

ताकत वाढवणारा परिवार
महाडिक कुटूंबियांची तीन जिल्ह्यात ताकद आहे. यामुळे भाजप आमदारांचे वर्चस्व वाढणार आहे. सत्ता बदलाच्या परिवर्तनामध्ये महाडिक कुटूंबियांची महत्वपूर्ण ठरेल, असा विश्‍वास भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

स्व. वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्याचे अनावरण
इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात भाजपाची ताकद मोठी आहे. संजयकाका आपल्याला ती आणखी वाढवावी लागेल. शिराळा मतदार संघातील आमचे मित्र राष्टलवादीत गेले असले तरी या मतदार संघात सम्राटबाबा आणि सत्यजीत भाऊ यांच्या माध्यमातून भाजपा मजबूत करण्यात येईल, असे उद्गार राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
पेठ नाका ता. वाळवा) येथील नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुलामध्ये स्व. वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या उभारलेल्या पूणार्कृती पुतळ्याचा अनावरण व वाळवा-शिराळा को-ऑप. दूध डेअरीचे उद्घाटन तसेच स्मृती ग्रंथ प्रकाशन सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा या संयुक्त कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आ. प्रविण दरेकर, आ. विनय कोरे, आ. सदाभाऊ खोत, डॉ. अतुल भोसले, माजी खा. धनंजय महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, माजी आ. अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. फडणवीस म्हणाले, नानासाहेब सृजनशील व संवेदनशील होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असणार्‍या हिरोजी महाडिक यांचा वारसा चालवत आहेत. नानासाहेबांनी संघर्षातून संस्था उभा केल्या आहेत. सर्व सामान्यांच्या मनात नानासाहेबांच्या बद्दल आत्मीयता होती. समाजात नानांच्या सारखे स्वत:च्या पलिकडे विचार करणारी माणसे आहेत. सम्राट महाडिक हा आता आपला पक्ष आहे. जो समाजाशी नाळ जोडून राहतो त्याला यश मिळते. नानासाहेब हे सत्ते सोबत न राहता सत्यासोबत राहिले. त्यामुळे त्यांचे मनसुबे, इच्छा शक्ती, धोरणे कोणीही उध्वस्त करू शकले नाहीत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, नानासाहेबांनी कर्तृत्वान मुले मिळवली. नानासाहेब कोणत्याही संकटाला घाबरले नाहीत. संघर्षामध्ये ही त्यांनी मोट बांधण्याचा प्रयत्न केला. धुर्त राजकारण्यांना सोबत घेवून ही राजकारण करण्यात यशस्वी झाले. राज्यात पुन्हा सरकार येईल. यामध्ये महाडिक कुटूंबाचा वाटा असेल. पराभावाने निराश न होता संघर्षाने नानासाहेबांनी काम केले आहे.
राहुल महाडिक म्हणाले, नानासाहेबांचे स्मृतीस्थळ हे आगामी पिढीस प्रेरणादायी ठरणार आहे. नानासाहेब कायम विरोधकांच्या पाठीशी राहत त्यांना मदत करत असत. सम्राट महाडिक म्हणाले, सत्ता गेल्यानंतर जो विरोधकांच्या पक्षात प्रवेश करतो ते महाडिक असतात. भाजपमध्ये आम्ही समाधानी आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना ही अनेक पदावर संधी दिली. वनश्री नानासाहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शिराळा मतदार संघातून अपक्ष निवडणुक लढवून सुमारे 50 हजार मते घेतली. नानासाहेबांनी जपलेल्या लोकांमुळे मला मते मिळाली. पक्षाच्या आदेशाप्रमाणे यापुढील काळात वाळवा-शिराळ्यात भाजपाचा आमदार दिसेल.
या कार्यक्रमाला आ. नितेश राणे, खा. आ. प्रकाश आवाडे, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. गोपीचंद पडळकर, सुरेश हाळवणकर, विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, जयराज पाटील, हुतात्मा कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी, विक्रांत पाटील, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पवार, राहुल आवाडे, सागर खोत, विद्याताई पाटील, डॉ. उषाताई दशवंत, शेखर इनामदार, दिपक शिंदे, नीता केळकर, भिमराव माने, विक्रमभाऊ पाटील उपस्थित होते.

खास सत्कार
चंद्रकांत पाटील यांनी मिनाक्षीताई महाडिक यांचा व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खास सत्कार केला. तुम्ही कर्तबगार आणि कर्तृत्ववान मुले घडवलीत, असे खास शब्दात त्यांनी कौतुक केले.

COMMENTS