यंदाच्या निवडणुकीत कृष्णेच्या खासगीकरणला रोखा : अविनाश मोहिते

Homeमहाराष्ट्रसातारा

यंदाच्या निवडणुकीत कृष्णेच्या खासगीकरणला रोखा : अविनाश मोहिते

आमची सत्ता असताना एफआरपीपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये उसाला अधिक दर दिला.

महाराष्ट्रात 3 लाख 92 हजार कोटींचे गुंतवणूक प्रकल्प
हिवरेझरे येथे गांजासह एकास अटक, गुन्हा दाखल
सातारा जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविणार : पालकमंत्री

इस्लामपूर / प्रतिनिधी : आमची सत्ता असताना एफआरपीपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये उसाला अधिक दर दिला. परंतू विद्यमान सत्ताधार्‍यांनी एफआरपी एवढाच दर दिला. कृष्णाची वाटचाल खासगीकरणाकडे सुरू आहे. या त्यांच्या मनोदयाला निवडणुकीत  रोखा, असे आवाहन संस्थापक पॅनलचे प्रमुख व कृष्णाचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले.

 ते नेर्ले (ता. वाळवा) येथे सदा पाटील मळा या ठिकाणी आयोजित केलेल्या सभासद संपर्क दौर्‍यावेळी ते बोलत होते.

यावेळी मोहिते पुढे म्हणाले की, सभासदांना अक्रियाशील ठरवणे, सभासदांचे राजीनामे घेणे हे कारखाना खाजगी करण्याचे लक्षण नव्हे तर काय आहे. संस्थापक पॅनेलने आपल्या कारकीर्दीत विविध योजना राबवून सभासदांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला. राजकीय षड्यंत्र रचून सत्ताधार्‍यांनी मात्र संस्थापक पॅनेलला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कृष्णेच्या येणार्‍या निवडणुकीत संस्थापक पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. 

यावेळी राजाराम माळी, जीवन माने, माजी संचालक वसंतराव पाटील, संचालक सुभाष पाटील, उदयसिंह शिंदे यांची भाषणे झाली. आभार जालिंदर पाटील यांनी मानले. कार्यक्रमास सतीश पाटील, शुभम पाटील, बबन दादा माळी, मारुती माळी, चंद्रकांत पाटील, मोहन पाटील, बाबुराव पाटील, राहुल पाटील, विक्रम पाटील याच्यासह सभासद उपस्थित होते.

COMMENTS