आनंदऋषीजी महाराज प्रतिमेची पालखी मिरवणूक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंदऋषीजी महाराज प्रतिमेची पालखी मिरवणूक

अहमदनगर/प्रतिनिधी : जैनमुनी आचार्यश्री आनंदऋषीजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक नगर तालुक्यातील वाकोडी येथे काढण्यात आली. वाकोडी ते आनंद धाम पा

एकनाथ दामू येळवंडे यांचे निधन
शेतपाणंद रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी
हॅलिकॉप्टर अपघातानंतर भारतीय लष्कराचा जवान 18 दिवसांपासून बेपत्ता l DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/प्रतिनिधी : जैनमुनी आचार्यश्री आनंदऋषीजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक नगर तालुक्यातील वाकोडी येथे काढण्यात आली. वाकोडी ते आनंद धाम पायी दिंडी सोहळा उत्साहात झाला. दरम्यान, आनंदऋषीजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील धार्मिक परीक्षा बोर्डात विविध धार्मिक उपक्रम झाले. सकाळी शहरातून शांतीमार्च काढण्यात आला. रक्तदान शिबीर, अन्नदान व अन्य उपक्रमही झाले.
आनंदऋषी महाराजांचे विचार युवा पिढीला समजावे यासाठी वाकोडी ग्रामस्थांनी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी वाकडी गावातून प्रभाग फेरी करीत विविध धार्मिक कार्यक्रम झाले. वाकोडी गावातील विविध जातीधर्माचे लोक एकत्रित येऊन आनंदऋषी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाकोडी ते आनंद धाम पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी समृद्धी नगर परिसरातील नागरिकांनी दिंडी सोहळ्याचे स्वागत करून महाप्रसाद वाटप केलेे. या दिंडी सोहळ्यात वारकरी बाल गोपाळांनी भाग घेतला होता. यावेळी बालयोगी अमोल जाधव महाराज,प्रदीप लुंकड,सुनील लुंकड, माजी उपसरपंच अमोल तोडमल, रमेश इनामकर, हरिभाऊ कर्डिले, अरुण इनामकर, सचिन तोडमल, कचरदास लुंकड, हौशाराम गवळी, मंजाबाप्पू मोडवे, सुभाष काळे, बाबासाहेब मोडवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

नगर शहरात शांतीमार्च
आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 30 व्या स्मृतीदिनी आचार्यश्रींच्या स्मृतीस्थळी आनंदधाम येथे भाविकांची मांदियाळी जमली. संपूर्ण शहरात सकाळपासूनच जय आनंदचा जयघोष झाला. मानवता, प्रेम, दयाभाव अशी महान शिकवण देणार्‍या आचार्यश्रींच्या स्मृतीनिमित्त शहरातून शांतीमार्च काढण्यात आला. नवीपेठ जैन धर्म स्थानकापासून शांतीमार्चला प्रारंभ झाला. शांतीमार्चमध्ये आ.संग्राम जगताप, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, शिवसेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक संजय चोपडा, सरोज कटारिया यांच्यासह जैन सोशल फेडरेशन, आनंद संस्कार शिक्षा अभियान, ब्राह्मी युवती मंचच्या युवती, महिला सहभागी झाल्या होत्या. आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त चिचोंडी शिराळ येथून आलेली पायी दिंडी ख्रिस्त गल्ली येथे या शांतीमार्चमध्ये सहभागी झाली. शांतीमार्चमध्ये जिजाऊ हास्य योगा क्लबच्या महिलांनी योगाचा संदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नवीपेठ, शहाजी रोड, कापडबाजार, दाळमंडई, आडतेबाजार, सराफबाजार, खिस्त गल्ली, जुनी वसंत टॉकीज रोड, सहकार सभागृहमार्गे शांतीमार्चचा आनंदधाम येथे समारोप झाला.

COMMENTS