वारी मार्गवरील गावांचा आषाढी पायी वारीला विरोध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारी मार्गवरील गावांचा आषाढी पायी वारीला विरोध

पंढरपूर / प्रतिनिधी : गेल्या वर्षी आलेली कोरोनाची पहिली लाट खूपच सौम्य होती; मात्र यंदाची दुसरी लाट खूपच घातक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे

पाणी प्रश्न सोडविणारच, नगरपालिकेची सत्ता द्या : विकास करून दाखवतो – आ. आशुतोष काळे
चांदवड देवळाचे आमदार राहुल आहेर यांची अगस्ती आश्रमास भेट
एसटीच्या प्रवाशांना मिळणार साडेपाच महिन्यांनी दिलासा

पंढरपूर / प्रतिनिधी : गेल्या वर्षी आलेली कोरोनाची पहिली लाट खूपच सौम्य होती; मात्र यंदाची दुसरी लाट खूपच घातक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. शेकडोंनी प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळ्यातील सर्वांत शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यांना पत्र लिहून पायी न येण्याची विनंती केली आहे. अन्य गावांनीही तोच मार्ग अवलंबला आहे. 

आषाढी यात्रा हा महाराष्ट्राचा सर्वांत मोठा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा मनाला जातो. शेकडो वर्षांपासून पालख्या आणि सोबत लाखोंचा जनसागर घेत हे सोहळे पंढरीच्या दिशेने पायी चालत येतात. हा सोहळा म्हणजे एक मोठे शहर रोज चालत पंढरीकडे येत असते. मार्गातील गावे या लाखोंच्या महासागराचे अतिशय आदराने स्वागत व सेवा करीत असतात. ही परंपरा वर्षानुवर्षे महाराष्ट्राने जपली आहे. या लाखो वारकर्‍यांसाठी आपल्या घराची कवाडे यात्रा काळात सताड खुली केलेली असतात; मात्र गेल्या वर्षी कोरोना आला आणि ही पायी वारीची परंपरा महामारीमुळे बसमधून पालख्या आणून पूर्ण करण्यात आली. गेल्या वर्षी आलेली पहिली लाट खूपच सौम्य होती; मात्र यंदाची दुसरी लाट खूपच घटक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. शेकडोंच्या प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळा पायी आणायचा वारकरी संप्रदायाचा आग्रह असून कोरोनाचे नियम पाळून मर्यादित संख्येत पायी पालखी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे.

पायी पालखी सोहळा आता पालखी मार्गावरील गावांना त्रासदायक वाटू लागला असून अजूनही कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना यंदादेखील पालखी सोहळे बसने आणावेत पायी वारी नको, असे ठाम मत या पालखी मार्गावरील गावागावातून पुढे येऊ लागले आहेत. संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्यातील वेळापूर हे माळशिरस तालुक्यातील हे मोठे गाव; पण आजही कोरोनाच्या भयानक दहशतीखाली जगात आहे. गावातील कोविड सेंटरमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत असून 25 हजारांच्या लोकवस्ती असलेल्या वेळापूर परिसरात दुसर्‍या लाटेमध्ये अकराशेपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाग्रस्त झाले होते. दुसर्‍या लाटेत 15 पेक्षा जास्त जणांनी आपले प्राण गमावले. यंदा पायी वारी अजिबात नको असाच सूर या गावातून निघत आहे. वास्तविक गेल्या वर्षी कोरोनाचे संकट कमी होते; मात्र यंदा हे संकट जास्त असल्याने आणि अजूनही धोका असल्याने यंदाही बसमधूनच पालख्या आणाव्यात असे डॉ. उदय माने देशमुख म्हणाले. पंढरपूर तालुक्यात पालखी सोहळ्यांनी प्रवेश केल्यावर भंडीशेगाव हे मोठे गाव आहे; मात्र आजही गावाच्या सरपंच व सदस्य हे गावात सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्येच बसून बाधित ग्रामस्थांची सोय पाहत आहेत. या गावातील सरपंच मनीषा येलमार यांना पायी वारी नको आहे. यंदा बसने पालख्या आणाव्यात अन्यथा पुन्हा एकदा कोरोनाचे महाभयंकर संकट वाढण्याची भीती येथील ग्रामस्थांच्या मनात आहे. ग्रामीण भागात अजूनही मोठ्या संख्येने कोविड रुग्ण सापडत असल्याने पायी वारीचा धोका यंदा नको, अशी त्यांची भावना आहे . गेल्या लाटेपेक्षा ही लाट जास्त भयंकर असून यात अनेकांचे बळी गेल्याने पायी वारी नको असे कळवळून ग्रामस्थ सांगत आहेत. भंडीशेगावमध्ये 270 पेक्षा जास्त रुग्ण बाधित होते. अजूनही अनेकांवर उपचार सुरू आहेत. दुसर्‍या लाटेत मनुष्यहानी जास्त झाल्याने ग्रामस्थ कोणताच धोका पत्करायला तयार नाहीत. संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम या मुख्य दोन पालखी सोहळ्याचा अखेरचा मुक्काम वाखरी येथे असतो. येथे शेवटचे रिंगण सोहळे करून पालखी सोहळे वाखरीत विसावतात. वाखरीमध्ये आठशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले होते. अजूनही अनेक रुग्णांवर उपचार सुरू असून रोज नवनवीन रुग्ण सापडत आहेत. एकट्या वाखरीत तब्बल 35 जणांचे आयुष्य या कोरोनाने संपवल्याने सर्वात जास्त दहशत वाखरी गावात आहे. म्हणूनच वाखरी ग्रामपंचायतीने संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळा व संत तुकाराम पालखी सोहळ्याला यंदा पायी वारी नको बस मधूनच पालख्या आणाव्यात असे लेखी पत्र देत आपला विरोध दर्शवला आहे.

COMMENTS