Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला शिक्षकांना त्रास देणार्‍या गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई करावी : नंदकुमार गोडसे

लेखी, तोंडी आदेश नाहीत : श्रीमती प्रतिभा भराडेशाळेतील बँचेस बाहेर काढण्यासंदर्भात कोणत्याही मुख्याध्यापकांना लेखी, तोंडी आदेश दिले नाहीत. विद्यार्थी

थापा मारणारा विचित्र बघितला नाही : आ. नाईक-निंबाळकर
सोनागव सोसायटीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पॅनेलचा धुव्वा
तामकणेच्या नाथ मंदीराच्या कामासाठी मदतीचे आवाहन

लेखी, तोंडी आदेश नाहीत : श्रीमती प्रतिभा भराडे
शाळेतील बँचेस बाहेर काढण्यासंदर्भात कोणत्याही मुख्याध्यापकांना लेखी, तोंडी आदेश दिले नाहीत. विद्यार्थी संख्येनुसार अतिरीक्त ठरलेले बँचेस शिक्षकांनी बाहेर काढले आहेत. चांगले काम करणार्‍या शिक्षकांना बोलण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. ज्या महिला शिक्षकांना आपण त्रास दिला असे वाटत असेल तर यापूर्वीच त्यांनी आपल्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली असती.

वडूज / प्रतिनिधी : मनमानी कारभार करण्यासह महिला शिक्षकांना त्रास देणार्‍या खटाव पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमती प्रतिभा भराडे यांच्यावर कारवाई करा. अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा वडूजचे माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे यांनी येथे परिषदेत दिला.
येथील विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना गोडसे यांनी सांगितले, सन 2007 ते 2012 या काळात आपण पंचायत समितीचे सदस्य होतो. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बँच उपलब्ध व्हावेत. यासाठी आपण सलग दोन वर्षे मोठा संघर्ष केला. त्यानंतर शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी बँचेस उपलब्ध झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सतत बसून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा कंटाळाही दूर झाला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बँच मिळाल्याने शाळेचे रूपडे पालटले. शिवाय लोकवर्गणीतून अनेक शाळांत बोलक्या भिंतीची निर्मीती झाली. शिवाय जिल्हा परिषद शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी लोकसहभागही वाढू लागला, त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा अधिक चांगल्या पध्दतीने कायापालट झाल्याचे दिसून येऊ लागले.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी जिल्हा परिषद शाळांत असणारे बँचेस काढून ठेवण्यास सांगितले. अनेक ठिकाणी हे बँचेस शाळेत ढिग लावून ठेवले आहेत. काही ठिकाणी बँच अन्य गावांतील शाळेत हलविण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच शाळेत रंगविण्यात आलेल्या बोलक्या भिंती पुसून त्या भिंती पांढर्‍या रंगाने रंगविण्यात आल्या आहेत. एका बाजूला अनेक गावांत दानशूर नागरिक जिल्हा परिषद शाळांना चांगल्या किंमती वस्तू भेट देत आहेत. तर दुसर्‍या बाजूला त्या चांगल्या वस्तू शैक्षणिक साहित्य कुलूपबंद करण्याचे काम श्रीमती भराडे करीत आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे गोरगरीबांच्या मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. तालुक्यातील रहिवासी असणार्‍या श्रीमती भराडे यांनी सर्वांना
बरोबर घेऊन चांगूलपणाची वागणूक देऊन तालुक्याचा शैक्षणिक नावलौकीक वाढविण्याची गरज आहे. मात्र त्या चांगले काम
करणार्‍या शिक्षकांनाही अवमानास्पद वागणूक देत आहेत.
याबाबींची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तालुकाभर शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन, उपोषण करण्याचा इशाराही यावेळी गोडसे यांनी दिला.

COMMENTS