चर्चेसाठी तयार, मात्र सुरक्षेची हमी हवी ; युक्रेनची रशियासमोर अट

Homeताज्या बातम्यादेश

चर्चेसाठी तयार, मात्र सुरक्षेची हमी हवी ; युक्रेनची रशियासमोर अट

कीव/वृत्तसंस्था ः रशियाने शुक्रवारी देखील युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ले करणे सुरूच ठेवले असून, युक्रेनची राजधानी कीव्ह शहर ताब्यात घेण्यासाठी रशिया

अहमदनगर शहरात राष्ट्रवादीला जबर झटका… माजी विरोधीपक्षनेता काँग्रेसमध्ये सामील
कोरोना काळात गरीबांसाठीच्या धान्याचे नगरला होत होते पीठ ; अटक केलेल्या आठ आरोपींना पोलिस कोठडी
श्री. राजाभाऊ घुले यांचा बिगबजेट “अंकुश” चित्रपट ६ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात

कीव/वृत्तसंस्था ः रशियाने शुक्रवारी देखील युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ले करणे सुरूच ठेवले असून, युक्रेनची राजधानी कीव्ह शहर ताब्यात घेण्यासाठी रशियाने जोरदार हल्ले केले. यात मोठी जीवितहानी झाली असून, मृतांचा आकडा अजून समोर आलेला नाही. येत्या 96 तासात रशिया यूक्रेनवर ताबा मिळवेल अशी भीती यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केलीय. अशावेळी यूक्रेनने एक पाऊल मागे घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यूक्रेन रशियासोबत चर्चा रण्यास तयार आहे असे यूक्रेनने जाहीर केले.
युक्रेनचे राष्ट्रपती वोल्दिमीर जेलेंस्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक यांनी सांगितले की, कीवच्या तटस्थतेबद्दल युक्रेन रशियाशी चर्चा करण्यास तयार आहे, मात्र सुरक्षेची हमी मिळायला हवी. रशियाचे सैन्य यूक्रेनच्या प्रमुख शहरांवर सातत्याने हल्ला चढवत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. रशियन सैन्याने चर्नोबेल परिसरावर आपला ताबा मिळवला आहे. रशिया, युक्रेनच्या नागरी भागावर हल्ले करणार नसल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी म्हटले होते. मात्र गुरूवारपासूनच नागरी भागावर हल्ले केल्यामुळे युक्रेनचे नागरिक भयभीत झाले आहेत. रशियाने जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने युक्रेनवर हल्ला केला असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. युक्रेनचे तीन तुकडे करून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती केल्यानंतर रशियाने युक्रेनच्या भूमीवर प्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. जगातील बडी राष्ट्रे या संघर्षात पडून जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या खाईत लोटले जाईल की काय, अशी धाकधूक निर्माण झाली आहे. रशियानं यूक्रेनचं दक्षिणेकडील शहर ओडेस्सावर देखील हल्ला केला आहे. सकाळपासून त्या शहरात चार ते पाच धमाके झाले आहेत. युद्धामुळं ओडेसामधील विमान सेवा बंद झालीय. रशियाकडून इमारतींवर रॉकेट हल्ले केले जात आहेत. रशियन फौजा यूक्रेनमध्ये टँक आणि मोर्टारसह घुसल्या आहेत. कीववर लवकरच रशिया ताबा मिळवेल, अशी स्थिती आहे.

युक्रेनने शस्त्रे खाली ठेवल्यास चर्चेस तयार : लावरोव्ह
युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर रशियाने चर्चेसाठी सहमती दर्शवली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशिया चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे की, युक्रेनचे सैन्याने शस्त्रे खाली ठेवल्यास युद्धाला पूर्णविराम देवून रशिया चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

सैनिकांना रोखण्यासाठी नद्यांवरील पूल उडवले
रशियाच्या सैनिकांनी युक्रेनची राजधानी कीव शहर ताब्यात घेण्यासाठी सैन्य पाठवण्यात आले. यात मोठी जीवितहानी झाली असली तरी युक्रेन कडवा प्रतिकार करतांना दिसून येत आहे. ओडेसा येथील सर्व सीमेवर रशियानं कब्जा केलाय. यूक्रेनची स्टेट बॉर्डर गार्ड सूमी शहरात रशियाशी टक्कर सुरु आहे. रशियाचे 800 सैनिक मारल्याचा दावा यूक्रेनच्यावतीने करण्यात आला.यूक्रेनच्या आर्मीने एक पूल उडवून दिला आहे. त्यामुळे रशियाचं सैन्य कीवमध्ये पोहोचण्यास अडचणी निर्माण होतील.

COMMENTS