Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यावरण क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे काम दिशा दर्शक राहिल : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ग्वाही

सातारा / प्रतिनिधी : अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ हे वातावरणातील बदलाचे दुष्परिणाम हे समाजातील प्रत्येक घटकाला जाणवत आहेत. पुढच्या पिढीला हे परिणा

पसरणी घाटात अज्ञातांकडून वणवा; आगीच्या ज्वाळांमुळे काही काळ वाहतूक ठप्प
 भाज्यांचे भाव घसरले
सातारा-सांगली वन विभागाची नाशिकमध्ये कारवाई; एकाला अटक

सातारा / प्रतिनिधी : अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ हे वातावरणातील बदलाचे दुष्परिणाम हे समाजातील प्रत्येक घटकाला जाणवत आहेत. पुढच्या पिढीला हे परिणाम जाणवू लागू नये. म्हणून आत्तापासूनच पर्यावरण संवर्धनाचे काम करावे लागेल. भविष्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे काम दिशा दर्शक राहिल, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात ग्लोबल वॉर्मिंग-ग्लोबल वॉर्निंग जागतिक तापमानवाढीमुळे होणारे हवामानातील बदल, त्यांचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा आणि दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब, डिस्ट्रीक्ट 3234- डी 1 यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. वंदना चव्हाण, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, कामधेनु विद्यापीठाचे कुलगुरु मदनगोपाल वार्षणेय, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, डॉ. अविनाश पोळ, डॉ. गुरुदास नुलकर, सिने अभिनेते आमिर खान (ऑनलाईन), सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, लायन्स क्लबचे सुनिल सुतार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, लायन्स क्लबचे सदस्य, पर्यावरण प्रेमी ऑनलाईन उपस्थित होते.
आत्तापर्यंत माणुस हा निसर्गाशी संघर्ष करीत जगत आला आहे, असे सांगून ना. नाईक-निंबाळकर म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकर्‍यांनीही या आव्हानाला तोंडदेत पिक पध्दतीत बदल केला पाहिजे. वातावरणातील बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन आपल्यापरीने काम करत आहे. या कामात लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जाईल. यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग घेऊन यापुढे पर्यावरणासाठी काम करीत राहणार असल्याचेही ना. नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.


पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी ग्रामीण भाग केंद्र मानून शाश्‍वत विकास आराखडा तयार करा : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे
वातावरणातील बदलामुळे संपूर्ण ऋतुचक्र बदलले आहे. कधीही पाऊस पडतो, गारपीट, ढग फुटी अशा संकटांना सर्वांनाच सामारे जावे लागत आहे. यामुळे जैवविविधतेवर परिणाम होत आहे. महसूल विभागाने वातावरणातील बदल रोखण्यासाठी आराखडा तयार करावा. ग्रामीण भागात सामाजिक काम करणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांचा सहभाग घेऊन पाणी व्यवस्थापन, बायोगॅस, सौर ऊर्जा, इतिहासकालीन पाण्याचे स्त्रोत यांचे संरक्षण व संवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण प्रेमी पर्यटन या उपक्रमाबाबत ग्रामीण भाग केंद्र मानून शाश्‍वत आराखडा तयार करावा, असे विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुक्याचा एक आराखडा तयार करावा. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात यावा. यामध्ये शाश्‍वत विकासावर भर देण्यात यावा. प्रत्येक नगरपालिकेने कचरा प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे करावेत. त्याचबरोबर बायो मेडिकल वेस्ट प्रक्रियेची नगरपरिषदेने वेळोवेळी तपासणी करावी. पर्यावरणाचा समातोल राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहनही डॉ. गोर्‍हे यांनी यावेळी केले.

COMMENTS