Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानाई – तुकाई गुरुकुल आष्टी येथे भव्य बालसंस्कार शिबीर संपन्न

आष्टी प्रतिनिधी - विद्यार्थी,पालक,भक्तमंडळी आणि साधक या सर्वांसाठी  आदरणीय भागवताचार्य ह.भ.प.आदिनाथजी महाराज दानवे गुरुजी यांच्या संकल्पनेने व प

श्री सिद्धिविनायक शाळेतील बौद्धिक अक्षम – बहुविकलांग मुलांसमवेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर
ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी होवू देणार नाही  

आष्टी प्रतिनिधी – विद्यार्थी,पालक,भक्तमंडळी आणि साधक या सर्वांसाठी  आदरणीय भागवताचार्य ह.भ.प.आदिनाथजी महाराज दानवे गुरुजी यांच्या संकल्पनेने व प्रेरणेने ज्ञानाई-तुकाई गुरुकुल,आष्टी येथे दिनांक 19 मे 2023 ते 26 मे 2023 या कालावधीत भव्यदिव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दैनिक कार्यक्रम अध्यात्मिक परिपाठ , ओव्या,प्रार्थना पाठांतर,व्याख्यान गीतापाठ (गीता 15 वा अध्याय पाठांतर,) संत परिचय , चर्चासत्र ,पखवाज व संगीत शिक्षण वर्ग,हरिपाठ व हरिकीर्तन आदींचे आयोजन करण्यात आले व सर्व कार्यक्रम नियोजनानुसार पर पडले.शिबिरात सहभाग घेण्यासाठी वयाची अट नव्हती.इ.3री च्या पुढील कोणीही विद्यार्थी तसेच त्यांचे पालक कोणीही सहभागी होऊ शकले.हे शिबीर सर्वांसाठी होते.तसेच शिबिरासाठी कोणतेही शुल्क अथवा फी घेतलेली नाही.या शिबिरामध्ये पंगतीचे नियोजन श्री सतिष दळवी सर,ह.भ.प.सोनाजी महाराज बनकर,ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे,ह.भ.प.प्रज्ञाताई दानवे महाराज,श्री नवनाथ डोके,ह.भ.प.शांतीलाल घोलप,संस्कृती विद्यामंदिर श्री तांबे सर,श्री अशोक डोके सर यांनी केले.अशोक डोके सर यांनी याआगोदरही अखंड हरिनाम सप्ताहामध्ये व धार्मिक कार्यक्रमानिमित्त विविध ठिकाणी त्यांचे मनोभावे अन्नदान ते नेहमीच प्रसाद म्हणून ते वाटप करीत असतात त्याच प्रमाणे त्यांनी आज ज्ञानाई -तुकाई गुरुकुल आष्टी येथे बालसंस्कार शिबीरात अन्नदान केले.ह.भ.प.प्रज्ञाताई दानवे महाराज,ह.भ.प.आकांक्षा ताई कोकणे,ह.भ.प.वेदिकाताई तावरे महाराज,ह.भ.प.पुष्पाताई महाराज जगताप ह.भ.प.सोनाजी महाराज तावरे ,ह.भ.प.सोनाजी महाराज बनकर,ह.भ.प.श्री हरि पुरी महाराज,.ह.भ.प.रामदास डोरले महाराज.आदींची सुश्राव्य कीर्तनसेवा संपन्न झाली . तसेच ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे यांची श्रीराम कथा झाली.त्यांना गायन साथ ह भ प  पुष्पाताई जगताप महाराज व ह भ प सतीश महाराज दळवी यांनी केली.पखवाज वादन ह भ प अवधूत महाराज आवारे यांनी केली.सकाळी 7 ते रात्री 8या वेळेत विविध विषयांवर अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले. शिबिरासाठी श्री सुंम्बरे साहेब, आदिकाताई लोखंडे,श्री रासकर दादा,ह.भ.प.दिनकर महाराज तांदळे,पत्रकार अण्णासाहेब साबळे,श्री पोकळे साहेब,श्री झगडे सर,प्रदीप पवार सर,जोशी काका आदि परमार्थ प्रेमी मंडळी उपस्थित होती.विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पेन,रजिस्टर हरिपाठाचे पुस्तक व शब्दगंध पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.यावेळी पत्रकार आण्णासाहेब साबळे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.तसेच सौ.शिंदे काकू यांचाही सन्मान करण्यात आला.ह.भ.प.आदिनाथजी महाराज दानवे गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले व शिबिराची सांगता झाली.

COMMENTS