चाकूचा धाक दाखवून वृध्द दाम्पत्यास लुटले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चाकूचा धाक दाखवून वृध्द दाम्पत्यास लुटले

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील वाळकी गावात वृद्ध शेतकरी जोडप्याला काठीने मारहाण करीत व चाकूने वार करीत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख

डिपीचे उद्घाटन करणारा राज्यातील पहिला मंत्री राज्याला लाभला
आयकर विभागाचे नुतन उपायुक्त अशोक मुराई यांचे स्वागत
ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील वाळकी गावात वृद्ध शेतकरी जोडप्याला काठीने मारहाण करीत व चाकूने वार करीत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाळकी येथील भोलेनाथवाडी भागात राहणारे शेतकरी प्रभाकर केरु बोठे (वय 75) व त्यांच्या पत्नी सौ. बोठे हे दोघे पहाटे चारच्या सुमारास लघुशंकेसाठी दरवाजा उघडून घराच्या बाहेर आले असता अज्ञात चौघा चोरट्यांनी घरात घुसून घरातील 15 हजाराची रोख रक्कम तसेच पत्नी बोठे हिच्या कानातील व अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेवून बोठे यांच्यावर चाकूने वार करून काठीने व दगडाने पाठीवर मारले. या चौघा चोरट्यांनी जाताना गावातील उमेश लोळगे यांच्या दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले. चोरट्यांनी एकूण पाऊण लाखाचा ऐवज चोरुन नेला. पहाटे 2 ते 4 च्या दरम्यान हा प्रकार घडला. जखमी वृद्ध शेतकरी प्रभाकर केरु बोठे यांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिसात अज्ञात चौघा चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी डिवायएसपी कातकाडे व सहायक पोलिस निरीक्षक सानप यांनी भेट दिली. गुन्ह्याच्या अधिक तपास पोलिस उप निरीक्षक मगर हे करीत आहेत.

COMMENTS