चंदिगड : सुवर्णपदक मिळविल्यानंतर कु. पायल जाधव.(छाया-सुशिल गायकवाड) कु. पायल जाधव ही माझी खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याचा मला सार्थ अभिमा
कु. पायल जाधव ही माझी खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच माझ्या विद्यार्थिनीने भारत देशाचे प्रतिनधित्व केले ही अभिमानास्पद बाब आहे.
रणजित झा (प्रशिक्षक)
मला भारतासाठी सुवर्ण पदक प्राप्त झाल्याचा खूप आनंद झाला आहे. तसेच अजून सराव करून आशियन गेम्स आणि ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मानस आहे.
कु. पायल जाधव (सुवर्णपदक विजेती)
लोणंद / वार्ताहर : लोणंद, ता. खंडाळा येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात द्वितीय वर्षातून कला शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थीनीने चंदीगड येथे झालेल्या इंडो नेपाळ इंटरनॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करताना कु. पायल जाधव हिने हे सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल पायल जाधव हिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. पायल जाधव हिला हे सुवर्णपदक स्पर्धेचे प्रमुख आयोजक मनजीत नेगी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविल्याबद्दल आई प्रतिमा जाधव आणि वडील इंद्रजीत जाधव यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे. पायल जाधव हिला इयत्ता चौथीपासून कराटेची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत तिचा कराटे क्षेत्रातील सराव सुरु आहे. आई-वडीलांचे पायल हीस नेहमी मोलाचे सहकार्य लाभते. तिच्या या यशाबद्दल तिने घेतलेल्या कष्टाचे विशेष कौतुक आई-वडिलांनी केले. या यशाबद्दल आयडियल स्पोर्ट्स फौंडेशनचे अध्यक्ष निखिल गिरामकर, प्रशिक्षक रणजित झा, एचआर मॅनेंजर मतीनाली सय्यद, प्राचार्य डी. घोलप, निलय बेंद्रे यांच्यासह इतरांनी पायल जाधव हिचे अभिनंदन केले.
COMMENTS