दिल्लीत 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्लीत 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

तोंडाला काळं फासून, गळयात चपलाचा हार टाकून काढली धिंड

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशात सर्वजण प्रजासत्ताक दिवस साजरा करत असतांनाच, दिल्लीतील कस्तुरबा नगरमध्ये एका महिलेसोबत धक्कादायक वर्तन केल्याचा व्हिडिओ स

समताच्या सेल्फ बँकिंग विड्रॉल सुविधेचा शुभारंभ
बाधिताच्या मृत्यूनंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांकडून तोडफोड
पोलीस आयुक्तालयासमोर तरूणानं घेतलं पेटवून l DAINIK LOKMNTHAN

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशात सर्वजण प्रजासत्ताक दिवस साजरा करत असतांनाच, दिल्लीतील कस्तुरबा नगरमध्ये एका महिलेसोबत धक्कादायक वर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या म हिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिचे मुंडन करण्यात आले. एवढयावरच न थांबता, तिच्या तोंडाला काळे फासून, गळयात चपलांचा हार टाकून तिची धिंड काढण्यात आल्याचा अमानवी प्रकार दिल्लीमध्ये समोर आला आहे.
याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. महिलेच्या लहान बहिणीने पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला वाचवले. तिचे समुपदेशन केले जात आहे.बहिणीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली चार महिलांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पीडित महिला आणि आरोपींमध्ये वैमनस्य होतं, त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचे केस कापले, तिला चपलांचा हार घालून रस्त्यावर फिरायला लावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न झाले असून तिला एक मूल आहे. मध्यंतरी अनेक महिने तिच्या शेजारी राहणारा एक तरुण तिचा पाठलाग करत होता. तो नंतर नोव्हेंबरमध्ये आत्महत्या करून मरण पावला. त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याच्या आत्महत्येसाठी महिलेला जबाबदार धरले होते. या प्रकरणामुळे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल संतापल्या आहेत. त्यांनी पीडितेची भेट घेऊन तिच्याशी बोलून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली. ’कस्तुरबा नगरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांनी 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला, तिचे मुंडन केले, चपलांचा हार घालून, तोंडाला काळेपासून तिची धिंड काढली. दिल्ली पोलिसांना नोटीस बजावत आहे. सर्व गुन्हेगार स्त्री-पुरुषांना अटक करून पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी, असे मालीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पूर्ववैमनस्यातून महिलेसोबत हे वर्तन केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला विवाहित आहे. तिला एक मूलही आहे. शेजारी राहणारा एक मुलगा आपल्या बहिणीच्या मागे पडला होता. नंतर त्या मुलाने 12 नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. आपल्या बहिणीमुळेच मुलाने आत्महत्या केल्याचे मुलाच्या कुटुंबीयांना वाटते आहे, असे पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे. मुलाच्या आत्महत्येनंतर ही महिला भाड्याने राहत होती.

COMMENTS