पारनेर नगर पंचायतीवर येणार राष्ट्रवादीची सत्ता

Homeताज्या बातम्या

पारनेर नगर पंचायतीवर येणार राष्ट्रवादीची सत्ता

शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा, पक्षात अधिकृत प्रवेश

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील कर्जत, पारनेर व अकोले या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाल्यानंतर त्रिशंकू अवस्थेत असलेल्या पारनेर नग

दिव्यांगांच्या रखडलेल्या मानधनासाठी उपोषण : नय्युमभाई सुभेदार
Ahmednagar : खाजगी हॉस्पिटलला जवळपास सहा कोटी रुपयांचा दणका | LOKNews24
अकोल्यातील रोटरी क्लबच्या टीमकडून वारकर्‍यांची सुश्रूषा

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील कर्जत, पारनेर व अकोले या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाल्यानंतर त्रिशंकू अवस्थेत असलेल्या पारनेर नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे या नगर पंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. पारनेर शहर विकास आघाडीच्या नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर तसेच भूषण उत्तम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला व आमदार नीलेश लंके आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादीमध्ये गुरुवारी सायंकाळी प्रवेश झाले. त्यामुळे राष्ट्रवादीने सत्तेसाठीचा बहुमताचा 9 आकडा गाठला आहे. पारनेर नगर पंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादीला 7, शिवसेनेला 6, शहर विकास आघाडीस 2, भाजपला 1 व अपक्ष 1 असे बलाबल होते. त्यामुळे शहर विकास आघाडी आणि भाजप व अपक्ष अशा चार सदस्यांवर सत्तेची गणिते अवलंबून होती. या पार्श्‍वभूमीवर आ. लंके यांनी शहर विकास आघाडीच्या दोघांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवल्याने पारनेर नगर पंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 11 नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा अर्जुन भालेकर तसेच भूषण उत्तम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी घेतला. आमदार लंके यांच्याशी अर्जुन भालेकर, चंद्रकांत चेडे यांनी चर्चा केल्यानंतर भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळेस शहर विकास आघाडीचे दुसरे नगरसेवक भूषण शेलार यांच्यासोबत आमदार लंके यांची बैठक झाली होती. भालेकर व शेलार यांनी आमदार लंके यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा करीत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला.

गटनोंदणीही झाली
गुरुवारी सकाळी भालेकर व व शेलार यांचे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर दुपारी नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 तसेच शहर विकास आघाडीचे 2 अशा नऊ सदस्यांची गट नोंदणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणी झाल्यानंतर शहर विकास आघाडीच्या दोन्ही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर येथील कार्यालयात हा सोहळा झाला. यावेळी अर्जुन भालेकर, बाळासाहेब नगरे, बाळासाहेब मते, बबन चौरे, राहुल झावरे, जितेश सरडे, कारभारी पोटघन, संदीप चौधरी, बाळासाहेब लंके, सचिन औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, अशोक घोडके, महेंद्र गायकवाड यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक सुरेखा भालेकर, भूषण शेलार, नीता विजय औटी, नितीन अडसूळ, विजय सदाशिव औटी, सुप्रिया सुभाष शिंदे, हिमानी बाळासाहेब नगरे, डॉ. विद्या कावरे, प्रियांका औटी उपस्थित होते.

पाणी योजनेसाठी साथ
पारनेर शहराची पाणी योजना गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. योजना मार्गी लावण्यासाठी आमदार लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. या योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल झाल्यानंतर अजितदादा यांनी योजनेसाठी निधी मंजुरीची घोषणा केली. शहरासाठी पाणी योजना हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी निवडणुकीनंतर आम्ही आमदार लंके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पाच वर्षात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकास करु व यासाठीच आम्ही राष्ट्रवादीला साथ दिल्याची भावना सुरेखा भालेकर व भूषण शेलार यांनी व्यक्त केली. यावेळी अर्जून भालेकर यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली

शहराचा विकास खुंटला
तब्बल पंधरा वर्षे आमदार असूनही पिण्याच्या पाणी योजनेचे कामही पूर्ण करू न शकणार्‍या माजी आमदार विजय औटी यांना मतदारांनी नाकारले आहे. विकासासाठी शहर विकास आघाडीने आता आमदार लंके यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS