कोरोनाचा संसर्ग आणि वाढते निर्बंध

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कोरोनाचा संसर्ग आणि वाढते निर्बंध

कोरोनामुळे सलग तिसर्‍यांदा लॉकडाऊन सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय शासनाला घेण्याची वेळ आ

समतेचा करार केव्हा होणार ?
दहशतवादाची कीड ठेचण्याचे आव्हान
राज्यपाल-सरकार संघर्ष

कोरोनामुळे सलग तिसर्‍यांदा लॉकडाऊन सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय शासनाला घेण्याची वेळ आली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढला असल्याचे चित्र दिसून येवू लागले आहे. या प्रकाराने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत संचार बंदी तर सकाळी 5 ते रात्री 11 या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली. याचा परिणाम उद्योग नगरी ओस पडण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. कोरोनाच्या काही दिवसापासून बदलले जाणारे रुप (व्हेरियंट) यामुळे उपचार करणार्‍यांसमोर मोठा प्रश्‍न उभा राहू लागला आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा काम करू लागली आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेचा मुख्य घटक म्हणजे मानव होय. मानवाच्या शरिरात होणारे बदल व हे बदल पाहून उपचार करणारी यंत्रणा आज आपल्याकडे विकसित झाली नाही. उदा. मानवाच्या शरिरातील कमी होणारे ऑक्सिजनचे प्रमाण हा उघड्या डोळ्यांनी दिसणारा नाही. त्यामुळे वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व लोक टेक्नॉलॉजीचा वापर करणारी असायला हवी. प्लेग, पटकी, कॉलरा, मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारामुळेही पूर्वी लोकांना जिवास मुकावे लागत होते. प्लेगच्या साथीमध्येही लोक इतके भयभित झाले होते की लोकांनी गावात असलेली घरे अशीच सोडून दिली होती. प्रत्येक आजारामध्ये होणारा संसर्ग हा हवा, पाणी आणि अन्न या व्यक्तीरिक्त कोणत्याही मार्गाने होत नाही. हे तीनच मार्ग असे आहेत की, मानवाला याला पर्यायी व्यवस्था म्हणून कशाचाही वापर करता येत नाही. प्लेगच्या साथीमध्ये लोकांनी गावातून आपली बिर्‍हाडे उचलूचन गावकुसा बाहेरील शेतात आपला संसार थाटला होता. यामागे एकच हेतू होता की, संसर्गजन्य आजारापासून दूर रहायचे असल्यास सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. अलीकडे वाढलेली लोकसंख्या व त्या लोकसंख्येला पुरेल ऐवढे काम व पोटाला अन्न मिळवताना अनेक समस्यांच्या जवळच मानवास वास्तव्य करावे लागत आहे. पूर्वी स्मशानभूमीपासून काही ठराविक अंतरापर्यंत लोकवस्ती नसायची. आज परिस्थिती बदलली असून जागेअभावी मानवास स्मशानभूमिच्या शेजारी निवासी संकुलात रहावे लागत आहे. या कारणामुळे रोगराई दूर जाण्याचे नाव कसे घेईल. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टास्क फोर्सचे मत जाणून घेतले. त्यादरम्यान महाराष्ट्रामध्ये नवीन 40 हजार रुग्णांची नोंद झाल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यात मिनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये रात्री 11 ते पहाटे 5 संचार बंदी तर पहाटे 5 ते रात्री 11 या वेळेत जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्बंधामुळे जनता घाबरल्याचे पहावयास मिळत आहे. मागील वर्षी तसेच त्याच्या मागील वर्षी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन पाठोपाठ पायाभूत सुविधा बंद करून प्रशासनाने जनतेला जणूकाही कैदेत ठेवल्यासारखी वागणूक दिली होती. त्यामुळे सामान्य नागरिक भीतीच्या छायेखाली आला आहे. काम बंद असल्याने घरखर्च कसा चालवायचा असा गंभीर प्रश्‍न कामगार वर्गावर आला होता. मिनी लॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट, सिनेमा हॉल 50 टक्के क्षमतेत चालवावे, स्पा सलून 50 टक्केक्षमतेने चालवावे. अंतर राष्ट्रीय प्रवास करणार्‍या प्रवाशांना 7 दिवस विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न, अंत्यसंस्कार यासाठीच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर समाजाने संबंधितांना पाठबळ देण्याऐवजी त्यांना वाळीत टाकल्याप्रमाणे वागणूक दिली. त्याचा परिणाम असा झाला की, अलीकडेच मेडिकल स्टोअरमध्ये कोरोना तपासणी किटची विक्री वाढली असल्याचे एका पाहणीमध्ये समोर आले आहे. या किटमुळे कोरोना बाधित रुग्ण तपासणीसाठी प्रयोगशाळा तसेच उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांच्याकडे जाण्याचे टाळून घरातच किरकोळ उपचार घेत राहिले. याचा परिणाम घरातील लोकांना संसर्ग झाल्याने अचानक आकडे वाढू लागल्याचा निष्कर्ष समोर येवू लागला आहे. गर्भधारणा झाली आहे का? या प्रमाणे किटचा वापर होवू लागला हे समाजासाठी धोकादायक बनले आहे.

COMMENTS