Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍यातील युवकास खून प्रकरणात जन्मठेप

सातारा / प्रतिनिधी : चारित्र्याच्या संशयावरून कोयत्याने वार करून पत्नीचा खून केल्याप्रकरणी येथील प्रतापगंज पेठेतील पतीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न

ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका झाल्यास मतदानावर बहिष्कार : नंदकुमार कुंभार
सरकार पडतंय की राहत हा गौण विषय : पंकजा मुंडे
आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा ’कराड गौरव पुरस्कार सौ. पुष्पा कुलकर्णी यांना जाहीर

सातारा / प्रतिनिधी : चारित्र्याच्या संशयावरून कोयत्याने वार करून पत्नीचा खून केल्याप्रकरणी येथील प्रतापगंज पेठेतील पतीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भारत कमलाकर जाधव (वय 27) असे शिक्षा मिळालेल्या पतीचे नाव आहे. श्रध्दा (वय 25) असे त्याच्या पत्नीचे नाव होते.
चारित्र्याचा संशय घेऊन तो वारंवार श्रध्दाला मारहाण करत होता. 27 जानेवारी 2018 ला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास त्याने तिच्या मानेवार कोयत्याने वार केला. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी जखमी अवस्थेत ती पहिल्या मजल्यावरून रस्त्यावर धावत आली. रस्त्यावरून पळत जाताना भारतने पाठलाग करून तिच्या हातावर कोयत्याने वार केले. रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
श्रध्दाच्या खुनाबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाहूपुरीचे तत्कालीन व सध्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, हवालदार श्रीनिवास देशमुख व आतिश घाडगे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान 11 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील महेश कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश मोरे यांनी भारत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकिलांना पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या सहायक फौजदार घार्गे, हवालदार शुभांगी भोसले, शमशुद्दीन शेख, ए. के. खुडे, जी. एस. फरांदे, राजेंद्र कुंभार, अश्‍विनी घोरपडे, अमित भरते यांनी सहकार्य केले.

COMMENTS