बारावीची 4 तर दहावीची 15 मार्चपासून परीक्षा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीची 4 तर दहावीची 15 मार्चपासून परीक्षा

मुंबई : कोरोनानंतर ओमायक्रॉनच्या भीतीने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असतांना, दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार की नाही, अशी विचारणा होत असतांना,

अखेर अशोक चव्हाणांच्या हाती भाजपचा झेंंडा
बीआरएस भाजपची बी टीम : आ. पृथ्वीराज चव्हाण
इंदापूरात गोळी झाडून एकाची हत्या

मुंबई : कोरोनानंतर ओमायक्रॉनच्या भीतीने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असतांना, दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार की नाही, अशी विचारणा होत असतांना, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून, पुढील वर्षी अर्थात 2022 साली 12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च रोजी होणार असून 10वीची लेखी परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचे आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होईल. तर 10 वीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 12वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च तर 10वीच्या प्रात्याक्षिक आणि तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होईल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. दरम्यान, करोना काळात परीक्षांचं स्वरूप आणि मूल्यमापनाच्या पद्धती यामध्ये बदल करण्यात आला होता. त्यासंदर्भात आता त्याविषयी काय पद्धत असेल, याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यावर देखील वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. मागील काळात जशी ऑफलाईन परीक्षा होत होती, तशीच आता होणार आहे. पेपर पॅटर्न आणि मूल्यमापन देखील तशाच स्वरूपाचं असेल, असे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटरवरून 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतील, याविषयी देखील माहिती दिली आहे. 12 वीचा निकाल जून 2022 च्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत तर 10वीचा निकाल जुलै 2022 च्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत लावण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

COMMENTS