आता मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष

नवी दिल्ली : मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. अखेर केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षांवरू

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णू देव साय
नगरच्या विकासासाठी कुणाशीही आघाडी करायला आम्ही तयार-खासदार सुजय विखे | आपलं नगर | LokNews24 |
दख्खनची राणी ९२ व्या वर्षात पदार्पण करणार

नवी दिल्ली : मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. अखेर केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याच्या नीती आयोगाच्या प्रस्तावाला गुरूवारी मंजुरी दिली आहे. यासाठी आता बाल विवाह विरोधी कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यामध्ये सुधारणा करावी लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून सुधारित विधेयक मांडले जाणार आहे. याला मंत्रिमंडळामध्ये मंजूरी देण्यात आली आहे. नीती आयोगामध्ये जया जेटली यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने याबाबत शिफारस केली होती.
मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुलगी 21 वर्षाची झाल्याशिवाय कोणत्याही पालकांना तिचे लग्न लावून देता येणार नाही. 15 ऑगस्ट 2020 रोजी लालकिल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्याचा उल्लेख केला होता. मुलींचा कुपोषणापासून बचाव करण्यासाठी त्यांचा विवाह योग्यवेळी होण्याची आवश्यकता असल्याचे मोदी म्हणाले होते. विद्यमान कायद्यानुसार मुलीच्या लग्नाची वय 18 वर्ष ठरवण्यात आले आहे. आता हे वय 18 वरून 21 वर्ष करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसा प्रस्तावही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला आहे. आता बालविवाह प्रतिबंधक कायदा, स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट कायदा आणि हिंदू मॅरेज अ‍ॅक्ट कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. नीती आयोगामध्ये जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आलेल्या टास्क फोर्सने मुलीच्या लग्नाचं वय वाढवण्याची शिफारस केली होती. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉलही या टास्क फोर्सचे सदस्य होते. त्याशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, साक्षरता मिशन, तसेच न्याय व विधी मंत्रालयाच्या विधेयक विभागाचे सचिव या टास्क फोर्सचे सदस्य होते. गेल्या वर्षी जूनमध्ये या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच टास्क फोर्सने आपला अहवाल सादर केला होता. पहिल्या मुलाला जन्म देण्याच्यावेळी मुलीचं वय 21 असावे, अशी शिफारस टास्क फोर्सने केली होती. तसेच लग्नाला होत असलेल्या विलंबामुळे कुटुंब, महिला, मुले आणि समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असंही टास्क फोर्सने अहवालात नमूद केले होते.

…मग पुरुषांचे वय 25 करणार का? : नवाब मलिक
केंद्र सरकारच्या निर्णयावर बोलतांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले की, देशातल्या प्रत्येक सज्ञान व्यक्तीला विवाहाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आम्हाला वाटते की महिलांचे वय 21 झाले, तर मग पुरुषांचे वय 25 केले जाईल का? आम्हाला वाटते की जो कुणी सज्ञान व्यक्ती आहे, त्याला आपल्या विवाहाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणताही विवाह देशात होऊ शकत नाही.

COMMENTS