नाशिक पुणे महामार्गावर गॅस वाहून नेणारा टेम्पो पलटी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक पुणे महामार्गावर गॅस वाहून नेणारा टेम्पो पलटी

संगमनेर/प्रतिनिधी।१२संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा सीएनजी गॅस वाहतूक करणारा आयश

LokNews24 Prime Time LIVE | चारित्र्याचा संशय घेणाऱ्या सासऱ्याचा सूनेकडून खून | loknews24
इथेनॉल टँकराच्या भीषण अपघातात एक जण जळून खाक; तर पाच जण जखमी
प्रवरेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्पायर महाराष्ट्रचे आयोजन

संगमनेर/प्रतिनिधी।१२संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा सीएनजी गॅस वाहतूक करणारा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने कुरकुंडी गावच्या हद्दीत तळपेवाडी परिसरामध्ये उलटला. हि घटना रविवार दि.१२ रोजी रात्री साडे बाराव्या सुमारास घडली. या अपघातात चालक जखमी झाला असून जास्त प्रमाणात गॅसची गळती झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुण्याहून नाशिकच्या दिशेने सीएनजी गॅस घेऊन जाणारा आयशर (क्रमांक एमएच. १४ जे.एल. ३१९२) संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावच्या तळपेवाडी शिवारातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून हा आयशर महामार्गालगत पलटी झाला त्यामुळे गॅस गळती सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्यासह कर्मचारी कॉन्स्टेबल नामदेव ढेरे तसेच घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले, कॉन्स्टेबल नामदेव गिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये टॅंकर चालक अमोल बारवे (रा. वाशिम) हा जखमी झाला असून त्याला रुग्णवाहिकेतून संगमनेर या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान गॅस गळती सुरू झाल्यामुळे पुण्याहून नाशिक कडे जाणारी दुतर्फा वाहतून बंद करण्यात आले आणि एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. यावेळी शंभर मीटर परिसरामध्ये बॅरिकेट्स लावण्यात आले. रात्रभर टॅंकररमधून गॅसची गळती सुरू होती. यावेळी संगमनेर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला याठिकाणी पाचारण करण्यात आले. आज रविवारी दि.१२ रोजी सकाळी गॅस कंपनीचे कर्मचारी आले असता त्यांनी गॅस गळती बंद केली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

COMMENTS