लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांची हुकूमशाही ; आंदोलकांना घेतले ताब्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांची हुकूमशाही ; आंदोलकांना घेतले ताब्यात

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : वीज पंपाची सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेने राहुरीत केलेल्या रस्ता रोको प्रसंगी पोलिसां

श्रीराम साधना आश्रमामध्ये पुष्पवृष्टी करून प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा
कोपरगाव तालुक्यातील पदवीधर मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
भातकुडगाव फाटा येथील उपोषण स्थगित

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : वीज पंपाची सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेने राहुरीत केलेल्या रस्ता रोको प्रसंगी पोलिसांनी अचानक आंदोलनात घुसून आंदोलकांना ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या कारवाईने एकच पळापळ झाली. दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेताना एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे कळते. उशिरापर्यंत आंदोलकांची धरपकड सुरू होती व त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.
शेतीपंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, सक्तीची वीज वसुली बंद करावी, ट्रान्सफार्मर बंद करू नये, शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान त्वरित द्यावे,शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. मे महिन्यापर्यंत शेतकर्‍यांकडे पैसे उपलब्ध होणार नाही. महावितरणने वीज बिल वसुल करण्यासाठी आमची हरकत नाही. परंतू रोहित्र बंद करुन वसुली करणे म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार असल्याचे म्हणत वीज पुरवठा खंडीत न करता वीज बील वसुली चालू ठेवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. यासाठी गुरुवारी दुपारी राहुरी बाजार समितीसमोर नगर-मनमाड राज्य महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्ष तसेच इतर सामाजिक संघटनांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. हे आंदोलन सुरू असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी फौजफाट्यासह अचानक आंदोलनात घुसून आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी,पप्पूशेठ येवले,नितीन पानसरे,प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे, पिंटूनाना साळवे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे,बाळासाहेब जाधव, वंचितचे अनिल जाधव,नामदेव पवार,लहानु तमनर आदी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

COMMENTS