ठिबक सिंचनासाठी कर्जत तालुक्याला राज्यात सर्वाधिक आर्थिक लक्षांक- आ.रोहित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठिबक सिंचनासाठी कर्जत तालुक्याला राज्यात सर्वाधिक आर्थिक लक्षांक- आ.रोहित पवार

कर्जत : 'कृषी विभागाने ठिबक सिंचनसाठी कर्जत तालुक्याला राज्यात सर्वाधीक आर्थिक लक्षांक दिला आहे. राज्यात सर्वात जास्त शेततळी देखील याच कर्जत तालुक्या

आमदार रोहित पवारांनीच मनोज जरांगेंना केले ओबीसींच्या विरोधात उभे !
महालक्ष्मी’ हॉस्पिटलमधील आयसीयु सेंटरने मिळणार जीवदान : डॉ.तोरडमल
कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच l LokNews24

कर्जत : ‘कृषी विभागाने ठिबक सिंचनसाठी कर्जत तालुक्याला राज्यात सर्वाधीक आर्थिक लक्षांक दिला आहे. राज्यात सर्वात जास्त शेततळी देखील याच कर्जत तालुक्यात झालेली आहेत, आता शेतकऱ्यांनी  ठिबक सिचंनाचा व यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर करून आदर्श सिचंन पद्धतीचे आदर्श उदाहरण राज्यासमोर ठेवावे. कडधान्य पिके व फळपिकांच्या उत्पादकता वाढीसाठी हे निश्चितच फायदेशीर ठरणार आहे असे आवाहन आ.रोहित पवार यांनी केले. 

आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मिरजगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महाडीबीटी योजनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.       या मेळाव्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल गवळी, कर्जतचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के,जामखेडचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. रोहित पवार पुढे म्हणाले,’महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाच्या सर्व योजना  ‘महाडिबीटी’ या प्रणालीवर ऑनलाईन करून जास्तीत जास्त पारदर्शकता व गतिमानता आणली आहे.त्यामुळे कुणावरही कसलाही अन्याय होणार नाही’.कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडुन विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले आहेत.कृषी विभागाने ऑनलाईन पद्धतीने पात्र अर्जातून शेतकऱ्यांची निवड केली असून संबंधित शेतकऱ्यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेल्या शेतकऱ्यांना पुर्वसमत्ती देण्यात आली आहे.या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारे खरेदी करण्यासाठी तसेच ट्रॅक्टर,अवजारे,ठिबक सिंचन, कांदाचाळ,शेततळे अस्तरीकरण,शेडनेट व इतर बाबीच्या कागदपत्रे अपलोड-खरेदी ते मोका तपासणीपर्यंत सर्व प्रक्रिया सुलभ करण्याच्या हेतूने या मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. महाडीबीटीवरील लॉटरीमध्ये निवड झालेल्या अर्जदारांना सर्व योजनेप्रक्रियेविषयी मार्गदर्शन व डिलर्सकडुन तात्काळ खरेदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी महाडिबीटी योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यात अनुदानाकरीता निवड झालेल्या लाभार्थ्यांना यावेळी ट्रॅक्टर, रोटावेटर, पॉवर टिलर, मळणीयंत्र यासारख्या औजाराचे वाटप करण्यात आले.    या मेळाव्यासाठी तालुक्यातील शेतकरी,ठिबक डीलर, ट्रॅक्टर डीलर,औजारे डीलर,सेतू केंद्र चालक आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS