अराजकता निर्माण करण्याचा डाव

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अराजकता निर्माण करण्याचा डाव

महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे. या मातीने नेहमीच समतेचा विचार

मुंबई महापालिका विजयाचे गणित
पण पाणी मुरते कुठे ?
राजकारणाचे गुन्हेगारीकरण कसे रोखणार ?

महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे. या मातीने नेहमीच समतेचा विचार रुजविला आहे. मात्र याच महापुरूषांचा महाभुमीत गेल्या काही महिन्यात नेमके काय सुरू आहे, याचा विचार केला तर, येथील राजकारणांचा आता किळस आल्याशिवाय राहत नाही. राजकारणांची खालावलेली पातळी, आणि राज्यासमोरील जणू सगळेच प्रश्‍न संपलेत आहे, या अविभार्वात राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. कोण ती नटी, कंगना राणावत हिने भारताला स्वातंत्र्य हे भीक मागून मिळाल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांचीच री ओढणारे विक्रम गोखले. या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. गोखले आता ज्येष्ठ अभिनेते आहेत, मात्र इतक्या वर्षांत त्यांना कधी स्वातंत्र्यांची भीक मिळाल्याचे वाटत नाही, किंबहुना कंगनाला देखील तसे वाटत नाही. मात्र आताच त्यांना असे का, वाटते या बाबींचा साकल्याने विचार करावा लागेल. गोखले यांनी इथेच न थांबता शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र यावे सांगत राजकीय पर्याय समोर ठेवला. राज्यात शिवसेना आणि भाजपची युती यापूर्वीच होती. मात्र सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्यामुळे शिवसेना बाहेर पडली. त्यावेळी भाजपला शहाणपण शिकवण्यासाठी गोखले महाशय समोर आले नाहीत. म्हणजेच आम्ही ते बरोबर आहेत, इतर ते चूक, अशी शेखी मिरवणारे हे महाशय. इतिहासाचे विकृतीकरण करण्यातच अनेकांची धन्यता गेली, त्यात यांचा देखील नंबर वरचाच म्हणावा लागेल.

एकीकडे महाराष्ट्रात हिंसाचारांचा आगडोंब उसळला आहे, आणि अशा तणावपूर्ण वातावरणात यांची ही विधाने त्यात तेल टाकून भडका उडवणारीच आहे. या वक्तव्यातून राज्यात अराजकता निर्माण करण्याचा त्यांचा डाव लपून राहिलेला नाही. अराजकता नेमकी कुणासाठी निर्माण करत आहे. भाजप राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी अशी बालिश विधाने करून, राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी ही मंडळी वातावरणनिर्मिती तर करत नव्हे ना, याचा शोध घेण्याची गरत आहे.  देशभर इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईने जनता हैराण झाली आहे. अशाच अस्थिर स्थितीत त्रिपूरा राज्यात हिंसाचार झाला. या घटनेच्या हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाणार्‍या जमावातील काहींनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी झालेल्या दगडफेकीचे रुपांतर हिंसाचारात झाले. यानंतर अमरावतीत संचारबंदी लागू करण्याची वेळ आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांनी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीच्या घटनेवर प्रतिक्रिया देत ’हिंदू मार नही खाएगा’ असे सांगून अस्थितेमध्ये लागलेल्या आगीत तेल टाकण्याचे काम केले. राज्यात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असतांना असे वादग्रस्त वक्तव्य करत, या वादाला फोडणी देण्याचे बळ यांच्यात येते कुठून. त्रिपुरामध्ये न घडलेल्या घटनेचे पडसाद मालेगाव, अमरावती या शहरामध्ये उमटतात. अर्थात ती अफवा पसरवण्यात आल्यामुळे हा हिंसाचार उफाळून आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. की अफवा नेमकी कुणी पसरवली, याचा राज्य सरकारने आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने शोध घेण्याची गरज आहे. कारण अशा अफवा पसरवणार्‍या प्रवृत्तींना वेळीच ठेचले तर, अशा हिंसाचाराच्या घटना घडणार नाही. 

COMMENTS