’मानवप्राणी’ असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्
’मानवप्राणी’ असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक्षा कुणी केली, तर ती वावगी ठरू नये. या माणूसपणात एक नैतिकता, सभ्यता, समजदारपणा, भल्या-बु-याची जाण, सद्सद्विवेकबुध्दी, हे विचार समाविष्ट करीत पूर्वापार मानवी वाटचाल होत राहिलेली आहे. मात्र सध्या अवती-भवती सातत्याने घडणा-या विविध प्रकारच्या विकृत घटनांनी माणसाला माणसाचीच भीती वाटावी, अशी स्थती निर्माण केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये कालच एका तरूणाला अत्यंत कू्ररतेने त्याची हत्या करण्यात आली. ही हत्या करण्यामागे त्याने गुरूग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथाचा अवमान केल्याचा दावा करण्यात येत आहे. गुरूग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथांचा अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही, आणि त्या आरोपीला कुणी पाठीशी घालूही नये, मात्र त्या आरोपीला ज्याप्रकारे कायदा हातात, घेत कू्ररपणे त्याची हत्या करण्यात आली, ही कृती देखील तितकीच निषेधार्य म्हणावी लागेल.
आपण गुरूग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथाचे वाहक आहोत, त्यामुळे त्या तरूणाचा इतक्या कू्ररतेने छळ करण्यापेक्षा, त्याला पोलिसांच्या हवाली करण्याचे औदार्य संबंधितांनी का दाखवले नाही. शिवाय त्या तरूणाचा खूनच केला नाही, तर त्याचा हात कापून तो बॅरीकेडसला लटकवण्यात आला, शिवाय त्याच्या हाताच्या नसा कापून टाकण्यात आल्या, आणि त्या विव्हळत मृत्यूच्या दारात जिंवत सोडण्यात आले. ही इतकी, भयावह कू्ररता कुठून येते, हा प्रश्न आहे. ही कू्ररता इथंच संपत नाही. सकाळी घटनास्थळी पोहचल्यानंतर देखील त्यांना मृतदेह काढू दिला जात नाही. तर या मृतदेहाला दसर्याच्या दिवशी रावणाच्या दहनासारखे जाळून टाकण्याची भूमिका निहंग्याकडून घेतली जाते. किती ही कू्ररता भरलेली आहे. सर्वच धर्माची शिकवण ही शांतता आणि त्यागाच्या संदेशावर आधारलेली आहे. त्यामुळे कुणी चुकत असेल, तर त्याचे मतपरिवर्तन करणे, ही गरज आहे. मात्र दहशत निर्माण करून आपले विचार पेरता येत नाही, ही साधी शिकवण हे निहंगे गुरूग्रंथ साहिब या ग्रंथातून घेऊ शकले नाही.
ज्या तरूणाची हत्या करण्यात आली तो तरूण दलित असल्याचे समोर आले आहे. शिवाय त्याचे नाव लखबीर सिंग असून त्याचे वडील माजी सैनिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखबीर सिंगभोवती उभ्या राहिलेल्या निहंग गटातील काही व्यक्ती त्याला जाब विचारत असल्याच्या चित्रफिती पोलिसांना मिळाल्या. या फितींच्या आधारे ही हत्या निहंग गटाने केल्याचा दावा पोलिसांनी केला. ‘गुरु ग्रंथ साहिब’ची प्रत उचलून पळ काढण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तीला आम्ही पकडले. त्याला सिंघू सीमेवर कोणी पाठवले याची विचारणाही केली. त्यानंतर आम्ही त्याचे पाय मोडले आणि हात कापून टाकला. मग त्याला बांधून ठेवले. ज्याने या व्यक्तीला पाठवले त्यालाही आम्ही ठार मारू, असे निहंग गटातील व्यक्ती सांगत असल्याची चित्रफीतही पोलिसांनी जप्त केली. या संपूर्ण पोलिसांचा तपास पोलिस करतील, याबद्दल शंका नाही. मात्र प्रश्न उरतो, ही कू्ररता येते कुठून. धर्माच्या नावाने बेभान होत कृती करणार्या धर्माभिमानी जनतेला हे कळत नाही की, जगातील कोणताही धर्म हा आपल्याला हिंसा करण्याची परवानगी देत नाही, तर मानवी जीवन कसे आदर्श पद्धतीने जगावे याची शिकवण देतो. असे असतांना निहंग्यांनी ज्या कू्ररतेने त्या तरूणाला मारले, यातून निंहगे नेमका काय संदेश देऊ इच्छित होते.
COMMENTS