घंटा वाजली….नाद राहू

Homeताज्या बातम्यासंपादकीय

घंटा वाजली….नाद राहू

खाली भेजा सैतान का घर अशी हिंदीतील म्हण अनेक पालकांनी आपल्या कुटूंबात याची देही याची डोळा अनुभवली,त्या पालकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.शाळेची घंटा वा

नीटप्रकरणी केंद्रासह ‘एनटीए’ला ‘सर्वोच्च’ नोटीस
शिंदे गटातील आमदार एकमेकांना भिडले
इंडियाविरुद्ध एनडीएचा सामना रंगणार

खाली भेजा सैतान का घर अशी हिंदीतील म्हण अनेक पालकांनी आपल्या कुटूंबात याची देही याची डोळा अनुभवली,त्या पालकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.शाळेची घंटा वाजली आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला.ओसाड पडलेली मैदानं खुलून गेली.अंधार खोल्यांमध्ये नवचैतन्य खिदळू लागलं.एव्हढा उत्साह एका घंटेच्या निनादाने नांदवला.हा उत्साह असाच निनादत ठेवण्यासाठी मुलांना व्यक्त होण्याचे मुक्त स्वातंत्र्य द्या.

आज उद्या करताकरता अखेर पितृपक्षाच्या सरत्या क्षणी राज्यातील तब्बल दीड वर्षापासून बंद असलेली शाळेची कवाडे उघडली. कोरोनाच्या महामारीत देशभरात लॉककडाऊन लादला गेल्यानंतर देवाची देवळं बंद करण्यात आली तशी ज्ञानाच्या मंदीरांनाही ताळे ठोकले गेले.देवव बंद पडली म्हणून चारदोन टक्के समाजाचा अपवाद वगळता कुणालाच फरक पडला देवाची अधोगती झाली नाही,मात्र ज्यांच्यात खरा देव पाहिला जातो त्या चिमुकल्यांचा शिक्षणाचा हक्क लॉककडाऊनने हिरावून घेतल्याने एका पिढीचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले.हे वय खरे तर खुल्या मैदानात हसण्या बागडण्याचं.हुंदडायच,खिदळायचं.जिथं हटकून शिस्त मोडायची तिथंच चार भिंतींच्या आत गुदमरायाचा प्रसंग या चिमुकल्यांवर कोसळला होता.   

घरासमोरच्या रस्त्यावर सोडा,अंगणातही पाय ठेवायचा नाही.घरातच बसून वेळ घालवायचा.इडीयट लॉकक्ससमोर बसून रहायचे.मोबाईलवर ऑननलाईन अभ्यास करायचा.अशा परिस्थितीत हे बालमन पार कोमेजून गेले होते.नेसर्गीक विकास खुंटला होता.त्यातून मुलांमध्ये चिडखोर भांडखोरपणा वाढीस लागला होता.मानसिक अवस्था दुर्बल होऊ लागली होती.नवनव्या आव्हानांना समोरे जाण्याची नैसर्गीक उर्जाच या बालमनाला मिळत नव्हती.मुलांची ही अवस्था पाहून अनेक कुटूंबात पालकही हवालदील झाले होते.स्वतःला शिस्तीचे भोक्ते समजणाऱ्या पालकांच्या अतिरेकाने माजवलेले अवडंबर या मुलांची मानसिकता आणखी खालावण्यास निमित्त ठरले.ही मुलं ठार वेडी होण्याआधी शाळा सुरू करा अशी आळवणीही म्हणूनच ठिकठिकाणाहून केली जात होती.   

अखेर शाळेसोबतच बंद पडलेल्या देवळातील देवाने मुलांची ही दयनीय मानसिकता पाहीली,आर्त हाक ऐकली आणि शाळा सुरू करण्याचा सरकारचा विवेक जागवला.सोमवार चार ऑक्टोबर पासून ज्ञानालयाचे दरवाजे खुले झालेत.आज उघडणार उद्या उघडणार असा जप अखेर थांबला.शाळेचे मैदान पुन्हा गजबजून गेले.शावेची घंटा वाजली.एक रंगी गणवेशातील चिमुकल्या पाखरांचा थवा खिदळू लागला.चिमुकल्यांच्या या गोंधळाने बंद पडलेल्या इमारतीतील खोल्यांमध्ये नवचैतन्य खेळू लागले.मैदानाची शोभा खुलू लागली. हा  आनंद, हा  उत्साह, ही  धावपळ आणि वाजणाऱ्या घंटेतून निनादणारा नाद अशी ही लगबग पुन्हा ओसंडून वाहू लागली आहे. हा नाद असाच निनादू द्या.नैसर्गीक हालचालींना बांध घालू नका.मास्तरांची छडी अडगळीत टाका.अभ्यासही काही काळासाठी बाजूला ठेवा. शासनाने लाख नियम सांगीतले असतील त्याचा अंमल करताना  थोडा हातचा ठेवा.मग बघा या चैतन्याचे गूणोत्तर कसे झपाट्याने वाढते.खाली भेजा सैतान का घर अशी हिंदीतील म्हण अनेक पालकांनी आपल्या कुटूंबात याची देही याची डोळा अनुभवली,त्या पालकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.शाळेची घंटा वाजली आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला.ओसाड पडलेली मैदानं खुलून गेली.अंधार खोल्यांमध्ये नवचैतन्य खिदळू लागलं.एव्हढा उत्साह एका घंटेच्या निनादाने नांदवला.हा उत्साह असाच निनादत ठेवण्यासाठी मुलांना व्यक्त होण्याचे मुक्त स्वातंत्र्य द्या.

COMMENTS