टाळेबंदी असलेल्या पारनेर तालुक्यातील गावांना अत्यावश्यक सेवेला परवानगी द्यावी

Homeताज्या बातम्याशहरं

टाळेबंदी असलेल्या पारनेर तालुक्यातील गावांना अत्यावश्यक सेवेला परवानगी द्यावी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पारनेर तालुक्यातील टाळेबंदी करण्यात आलेल्या गावात अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला व किराणा दुकान

नेवासेतील महसूल खात्याचा सावळा गोंधळ
चाळीस हजार वृक्षरोपे वाटणारे पर्यावरण मित्र संदीप मालुंजकर
वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पारनेर तालुक्यातील टाळेबंदी करण्यात आलेल्या गावात अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला व किराणा दुकान सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. 

या मागणीचे निवेदन भाजप कामगार आघाडी पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुनील म्हस्के, तालुका उपाध्यक्ष सचिन ठुबे यांनी तहसीलदार यांना दिले.

पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना काही गावात टाळेबंदी करण्यात आली आहे. या गावात भाजीपाला व किराणा आदी अत्यावश्यक सुविधांवर निर्बंध आनल्याने सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत आहे. बंद गावातील अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला व किराणा दुकाने यांना सकाळी 11 ते 2 या वेळेत चालू राहण्याबाबत आदेश देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

COMMENTS