Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘तुम्ही गेल्यानंतर आमच्याकडे काहीच उरलं नाही…’ वडीलांच्या निधनानंतर अंकिताची भावुक पोस्ट

पवित्रा रिश्ता' मालिकेतून अंकिता लोखंडेला अर्चना या भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. १२ ऑगस्ट रोजी अर्थात शनिवारी अंकिताच्या वडीलांचे निधन झाले.

अंकिता लोखंडेने अखेर प्रग्नेंसींच्या चर्चांवर सोडलं मौन
अंकिता लोखंडे ठरली बिग बॉसची सर्वात महागडी स्पर्धक
हार पचवू शकली नाही अंकिता लोखंडे स्पष्ट दिसला रडवेला चेहरा

पवित्रा रिश्ता’ मालिकेतून अंकिता लोखंडेला अर्चना या भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. १२ ऑगस्ट रोजी अर्थात शनिवारी अंकिताच्या वडीलांचे निधन झाले. वडीलांच्या अचानक एक्झिटने अंकितासह तिच्या कुटुंबीयांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. वडिलांच्या निधनानंतर नुकताच अंकिताने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. अंकिताचं आणि तिच्या वडिलांचं एक खास बॉन्डिंग होतं. नुकतंच अंकिताने सोशल मीडियावर वडिलांबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने वडिलांसोबतचे काही खास क्षण शेअर केले आहेत. अंकिता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच इन्स्टाग्रामवर अंकिताने एक व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे आणि तिच्या वडीलांचे चाहत्यांना अनेक कधीही न पाहिलेले फोटो पहायला मिळत आहेत. वडीलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये पोस्टमध्ये तिने ‘आई- वडिलांची कधीच कोणी जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे जर कधी तुम्हाला त्यांची काळजी घेण्याची संधी मिळाली तर ती गमावू नका.’ अशा भावना देखील अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये मांडल्या आहेत.

अंकिता तिच्या इमोशनल पोस्टमध्ये म्हणते, “पप्पा, मी तुमचे वर्णन शब्दात करू शकत नाही. पण एवढेच सांगू इच्छिते की, मी माझ्या जीवनामध्ये तुमच्यासारखा मजबूत, उत्साही आणि मोहक व्यक्तीमत्त्व असलेली व्यक्ती पाहिलेली नाही. तुम्ही आम्हाला सोडून गेल्यानंतर मी तुमच्याबद्दल खूप काही जाणू शकले. तुम्हाला भेटायला आलेले सगळे लोकं फक्त तुमचीच स्तुती करत होते. तुम्ही कशाप्रकारे त्यांना रोज ‘गुड मॉर्निंग मेसेज पाठवतात, त्यांना कॉल करतात किंवा एखाद्याची आठवण आल्यावर त्याला न विसरता व्हिडीओ कॉल करता, हे सांगताना सर्वांनीच तुमची आठवण काढली. तुम्ही प्रत्येकासोबत नातं इतकं जिवंत ठेवलं होतं, आता मी पण तुमच्या स्वभावासारखी कशी आहे?, त्या प्रश्नाचं उत्तर मला आता कळालं. तुम्ही मला चांगलं आयुष्य, कधीही विसरणाऱ्या आठवणी आणि नातेसंबंधांविषयी खूप चांगली समजूत दिली….” त्याने पुढे लिहिले की, “तुम्ही मला कधीच हार मानायला शिकवलं नाही. तुम्ही मला कायमच राजासारखं कसं जगायचं याची शिकवण दिली आणि उडण्यासाठी पंख दिले. मी तुम्हाला वचन देते की तुम्ही सदैव माझ्यासोबत राहणार आहात.

तुम्ही मला तुमची काळजी घेण्याची संधी दिली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी आणि आई फक्त एकच विचार करतोय, तो म्हणजे, आता आपण रोज सकाळी उठून नेमकं काय करायचं? कारण आम्ही दोघीही तुमच्या सेवेसाठी कायम हजर राहायचो. पप्पांचं जेवण, पप्पांचा नाश्ता आणि पप्पांची फळे… तुमच्या त्या सर्व गोष्टी आमच्या कायमच डोक्यात राहायच्या. पण आता तुम्ही गेल्यानंतर आमच्याकडे करण्यासारखं असं काहीच उरलं नाही.”पुढे आपल्या पोस्टमध्ये अंकिता म्हणते, “आम्हाला तुमच्याप्रमाणे खंबीर बनवल्याबद्दल धन्यवाद बाबा. तुम्ही खूपच भाग्यवान होते, तुम्हाला आईसारखी बायको मिळाली. तिने तुम्हाला सर्वस्व दिलं. तुम्हीसुद्धा तिच्यावर भरभरून प्रेम केलंत. मी तुम्हाला वचन देते, आम्ही कायमच आधी पेक्षा जास्त तिची काळजी घेऊ, तिच्या आनंदाला सर्वात आधी महत्व देऊ, तिचे पूर्वीपेक्षा आता जास्त लाड करू. तुम्ही दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी आणि मला घडवल्याबद्दल धन्यवाद. मी नेहमीच तुमच्यावर प्रेम करत राहील.” असं आश्वासन तिने वडिलांना दिलंय.अंकिता पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणते, “आपल्या आयुष्यात आई-वडील खूप महत्त्वाचे असतात. कारण त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. जर तुम्हाला त्यांची कधी काळजी घेण्याची संधी मिळाली तर ती गमावू नका. एकदा आपल्याला सोडून गेलेली व्यक्ती परत कधीच येत नाही. म्हणून त्यांना कायम सर्वस्व द्या, आनंद, वेळ, काळजी, प्रेम.. सर्वकाही द्या. त्यांना फक्त हेच हवं असतं…” असा सल्ला तिने तिच्या चाहत्यांना दिला.

COMMENTS