मनपाच्या आरोग्य सेवा गरजूंन पर्यंत पोहोचविणार

Homeताज्या बातम्याशहरं

मनपाच्या आरोग्य सेवा गरजूंन पर्यंत पोहोचविणार

अहमदनगर प्रतिनिधी - समाजाने विश्वासाने पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली आहे त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पद हे शोभेच

केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली
कपडे धुण्यासाठी गेलेली महिला ओढ्यात गेली वाहून
जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची वाटचाल सहा हजारांकडे

अहमदनगर प्रतिनिधी –

समाजाने विश्वासाने पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली आहे त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पद हे शोभेचे नसून, पदाच्या माध्यमातून विकासाचे व समाजाचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदाच्या माध्यमातून विविध विकासाचे प्रश्‍न सोडविण्याचे आहे. विकास कामातून पदाला न्याय देण्याचे काम करणार आहे.महिलांचे विविध प्रश्‍न प्रलंबित आहेत ते सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे शहरातील मनपा आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा ही गरजूंन पर्यत पोहोचणार आहे,तसेच बोरुडे परिवाराचा सामाजिक कार्याचा वारसा असाच पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे यांनी व्यक्त केले.

            बोरुडे परिवाराच्यावतीने मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी पुष्पाताई बोरुडे व उपसभापती पदी मीनाताई चोपडा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करताना मा.महापौर शीलाताई शिंद समवेत मा.नगरसेविका छबुताई बोरुडे,मा.नगरसेविका इंदूबाई बोरुडे,मा.सभापती योगिता सत्रे, नगरसेविका सुप्रिया जाधव,मा. उपमहापौर अनिल बोरुडे,मा.नगरसेवक दगडू मामा पवार,भीमाशंकर लांडे,श्री नातू, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कलावती बोरुडे,हिराबाई बोरुडे,लीलाबाई बोरुडे,मकरंद कुलकर्णी,नानासाहेब लांडे,गोरख बोरुडे,किरण बोरुडे आदी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना पुढे पुष्पाताई बोरुडे म्हणाल्या की,कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी मनपाची आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, प्रभागातील विकास कामांना गती देणार तसेच आत्तापर्यंत प्रभागातील नागरिकांनी कै.मा.उपनगराध्यक्ष रावसाहेब बोरुडे,कै.बाबासाहेब बोरुडे,अर्जुनराव बोरुडे,वसंतराव बोरुडे,मा.उपमहापौर अनिल बोरुडे,छबुताई बोरुडे,इंदूबाई बोरुडे यांना प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सर्वसामान्य नागरिकांनी दिली होती.आता नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या संधीचे कामाच्या माध्यमातून नक्कीच सोने करील असे त्या म्हणाल्या.

           यावेळी बोलताना मा.महापौर शीलाताई शिंदे म्हणल्या की, सभापती पुष्पाताई बोरुडे या विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या नगरसेविका आहेत त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी त्या सक्षम पणे पार पाडतील,मा.उपमहापौर अनिल बोरुडे यांनी गेली वीस वर्षांमध्ये विकास कामातून प्रभागातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. विकास कामांमध्ये त्यांनी कधीही राजकार आणले नाही असे त्या म्हणाल्या.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख बोरुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण बोरुडे यांनी मानले.

           यावेळी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रदीप बोरुडे,शरद बोरुडे,अभिजित बोरुडे,सुनील बोरुडे,संदिप पाटील,जालिंदर बोरुडे, चंद्रकांत बोरुडे,अरुण बोरुडे,भूषण बोरुडे,संतोष उगले,गणेश शिंदे,वैभव नेमाने,सौरभ बोरुडे,गणेश उदावंत,रमेश बोरुडे,गौरव बोरुडे,अतुल बोरुडे,देवआनंद बोरुडे,कैलास बोरुडे, सुनील बोरुडे,शिवाजी बोरुडे,अक्षय बोरुडे,विनोद बोरुडे,अनिल बोरुडे,दिनेश बोरुडे आदी सर्वांनी परिश्रम घेतले.

COMMENTS