आजचे राशिभविष्य दि. ०१-१०-२०२१

Homeताज्या बातम्याधर्म

आजचे राशिभविष्य दि. ०१-१०-२०२१

मेष:- कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील. इतरांना मना

पूरग्रस्त महाड व चिपळूणला वाढीव मदत द्यावी : नाना पटोले
मैत्रीच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणार्‍या महिलेवर गुन्हा
मोबाईलवर बोलताना हटकले, पतीला चक्क बॅटने बदडले…
  • मेष:- कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील. इतरांना मनापासून मदत कराल.शुभ अंक ८ ,शुभ रंग गुलाबी 
  • वृषभ:- कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील. तांत्रिक कामात चाल ढकल करू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित बदल घडून येतील.शुभ अंक ४ ,शुभ रंग  हिरवा
  • मिथुन:- जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका. प्रवासात सावधानता बाळगावी. कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या. हजरजबाबीपणा दाखवताना सावध रहा. शुभ अंक ७ , शुभ रंग   पिवळा 
  • कर्क:- अधिकारी लोकांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात स्त्री वर्गाचा हात लागेल. पत्नीच्या कमाईचा लाभ होईल. सहकार्‍यांशी जमवून घ्या. मित्रांकडून लाभाची शक्यता. शुभ अंक ५  शुभ रंग  पांढरा
  • सिंह:- सरकारी कामाला गती येईल. मित्रांची मोलाची मदत मिळेल. कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल . जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. शुभ अंक ३ शुभ रंग  गुलाबी
  • कन्या:- जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील. अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाई-गडबड करू नका. कमिशन मधून चांगला लाभ होईल. शुभ अंक २ शुभ रंग  लाल 
  • तूळ:- स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल. मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो. काळाची पावले ओळखून वागा. शुभ अंक ५ शुभ रंग  पांढरा
  • वृश्चिक:- वैचारिक सैरभैरता टाळावी. गृह शांती जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. अती विचारात वेळ वाया घालवू नका. शुभ अंक ८   शुभ रंग  केशरी 
  • धनू:- भावंडांकडून त्रास संभवतो. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. गरज नसेल तर प्रवास टाळवा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. शुभ अंक ६   शुभ रंग    पिवळा
  • मकर:- काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. दिवसभर कामात गुंतून राहाल. चिकाटी सोडून चालणार नाही. पित्त विकाराचा त्रास संभवतो. शुभ अंक ५   शुभ रंग   लाल 
  • कुंभ:- क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. मुलांच्या खोडकरपणाला आळा घालावा. निश्चयावर ठाम राहा. शुभ अंक ३ शुभ रंग  निळा
  • मीन:- बदल लक्षात घेऊन वागावे. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. वादविवादात सहभागी होऊ नका. रेस, सट्टा यांतून लाभ संभवतो. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. शुभ अंक १   शुभ रंग  केशरी 

COMMENTS