Ahmednagar : सीना नदीचे होणार सुशोभिकरन…मंत्री जयंत पाटलांनी केली पाहणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ahmednagar : सीना नदीचे होणार सुशोभिकरन…मंत्री जयंत पाटलांनी केली पाहणी

आ. संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे सीना नदीचे पूर नियंत्रण रेषा मध्ये फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली

न्यायालयात जाण्याचे कोणतेही कारण नाही ः जयंत पाटील
तलाठी परीक्षेतील गोंधळाची एसआयटी चौकशी करा
तुमचा फौजदाराचा हवालदार केला आमची मापे कशाला काढता?

आ. संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे सीना नदीचे पूर नियंत्रण रेषा मध्ये फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील नगर दौर्‍यावर आले असता जिल्हा प्रशासनाला सदर पूर नियंत्रण रेषाची पुन्हा फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन सीना पात्रातील अतिक्रमणे काढावी, तसेच नदीपात्राची खोलीकरण व रुंदीकरण करावे व सीना नदी सुशोभिकरना साठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार .अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत दिली.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सीना नदी पात्राची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. संग्राम जगताप, आ. डॉ. किरण लहामटे, माजी आ. नरेंद्र घुले, उपमहापौर गणेश भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,यासह  आदी उपस्थित होते.

COMMENTS