मी भाजपाच्या प्रत्येक मतदारसंघात जाईन आणि तिथून त्यांना हाकलून लावेन…

Homeदेश

मी भाजपाच्या प्रत्येक मतदारसंघात जाईन आणि तिथून त्यांना हाकलून लावेन…

वेब टीम : कोलकाता मुर्शिदाबाद-समशेरगंज आणि जांगीपूर या दोन ठिकाणी ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अभिषेक मुखर्जी आज पश्चिम ब

सत्ताधारी-विरोधकांच्या आक्षेपामुळे निकालाला उशीर | DAINIK LOKMNTHAN
कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ त होणार मिलिंद सोमनची एन्ट्री
पोलिस अधीक्षक कार्यालयात पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न

वेब टीम : कोलकाता

मुर्शिदाबाद-समशेरगंज आणि जांगीपूर या दोन ठिकाणी ३० सप्टेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अभिषेक मुखर्जी आज पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये प्रचार करत आहे. 

या कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना त्यांनी मोदी सरकार आणि ईडी-सीबीआय चौकशीबाबत टीका केली आहे. “येत्या तीन वर्षांत भाजपाला देशाच्या बाहेर काढण्याचे माझे ध्येय आहे. 

मी भाजपाच्या प्रत्येक मतदारसंघात जाईन आणि तिथून त्यांना हाकलून लावेन. त्यांच्या ईडी आणि सीबीआय माझे काहीही करू शकत नाही. ‘खेला’ आसाम आणि त्रिपुरामध्ये सुरू झाला आहे. 

भाजपाचा विकास हा फक्त नाव बदलण्यापर्यंतच मर्यादित आहे. जर ते इथे जिंकले असते, तर मुर्शिदाबादचे नामकरण मोदीशाहबाद झाले असते, अशा शब्दांत अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

सध्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यादरम्यान, मुर्शिदाबाद मतदारसंघात प्रचार करताना अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपाला देशाबाहेर काढण्याचे लक्ष्य असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसवरही यावेळी टीका केली. “काँग्रेस फक्त भाषण देऊ शकते. काँग्रेस रस्त्यावर उतरून काम करू शकते का? 

काँग्रेस भाजपाला हरवेल का? असा साहिल करत काँग्रेस भाजपाकडून पराभूत होत आहे आणि आम्ही भाजपाला पराभूत करत आहोत.” असेही ते यावेळी म्हणाले.

COMMENTS