श्रीगोंदा : महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या माजी विद्यार्थिनी तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध निरीक्षक पदावर

श्रीगोंदा : महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या माजी विद्यार्थिनी तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध निरीक्षक पदावर नुकत्याच नियुक्त झालेल्या सुप्रिया भाऊसाहेब मखरे यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी “कठोर परिश्रम हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे,” असा प्रेरणादायी संदेश दिला.सुप्रिया मखरे म्हणाल्या, “माझी खरी जडणघडण रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये झाली. बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून संपूर्ण लक्ष स्पर्धा परीक्षांकडे केंद्रित केले. सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर हे पद मिळवले. या यशामागे माझे आई-वडील आणि रयत शिक्षण संस्थेचे मोलाचे योगदान आहे.”कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले बाबासाहेब भोस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर किंवा अभियंता होण्याचेच स्वप्न न पाहता स्पर्धा परीक्षांमधूनही उज्ज्वल करिअर घडविण्याचा निर्धार केला पाहिजे.”यावेळी व्यासपीठावर प्राचार्य दिलीप भुजबळ, पीटर रणसिंग, पर्यवेक्षक सुनिता काकडे, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. ईश्वर नवगिरे, प्रा. समीर भिसे, प्रा. दत्तात्रय तवले, प्रा. संतोष मगर, प्रा. दिनकर मगर, प्रा. चंद्रकला निक्रड, भाऊसाहेब मखरे, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन झगडे तसेच गुरुकुल प्रमुख बापू जाधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर साबळे यांनी केले, तर माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन झगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS