पौड: पुणे जिल्ह्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी 'सिया गोयल' हिच्या नावाची चर्चा देशभर सुरू असतानाच, आता मुळशी तालुक्यातून 'सिया' नावाच्या

पौड: पुणे जिल्ह्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी ‘सिया गोयल’ हिच्या नावाची चर्चा देशभर सुरू असतानाच, आता मुळशी तालुक्यातून ‘सिया’ नावाच्याच एका महिलेकडून ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ५६ लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाची बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे ही फसवणूक झाली असून, याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी वेगवेगळ्या कारणांनी तक्रारदार पोलीस पाटलाकडून टप्प्याटप्प्याने ५६ लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही रक्कम अथवा परतावा मिळाला नसल्याने ही फसवणूक उघडकीस आली.
सोशल मीडियावरील जाहिरातीने जाळ्यात ओढले
या संपूर्ण प्रकाराची सुरुवात सोशल मीडियावर दिसलेल्या एका आकर्षक जाहिरातीपासून झाली. ही जाहिरात एका नामांकित ब्रोकरेज कंपनीची असल्याचे भासवून शेअर बाजारात कमी धोक्यात मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तक्रारदाराने जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवरील एका गुंतवणूकविषयक ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले.
‘सिया’ नावाच्या महिलेने साधला संपर्क
ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर ‘सिया’ नावाच्या एका महिलेने तक्रारदाराशी संपर्क साधून आपण शेअर बाजार तज्ज्ञ असल्याचे सांगितले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी एका बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर केला. सुरुवातीला काही रक्कम गुंतवल्यानंतर ॲपमध्ये मोठा नफा झाल्याचे खोटे चित्र दाखवण्यात आले. तसेच सवलतीच्या दरात आयपीओ शेअर्स आणि विशेष योजनांचे आमिष दाखवून वेळोवेळी मोठी रक्कम जमा करून घेतली.
ॲपमध्ये १० कोटींचा बनावट नफा अन् पुन्हा ३० लाखांची मागणी
तक्रारदाराने गुंतवणूक वाढवल्यानंतर संबंधित ट्रेडिंग ॲपच्या डॅशबोर्डवर त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य तब्बल १० कोटी रुपये झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, तक्रारदाराने ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, पैसे सोडवण्यासाठी आणखी ३० लाख रुपये ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ म्हणून जमा करावे लागतील अशी नवी मागणी आरोपींनी केली. अधिक पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला आणि गुंतवलेली ५६ लाखांची मूळ रक्कमही परत केली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पौड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी ‘सिया’ नावाच्या महिलेसह तिच्या इतर अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून बनावट ट्रेडिंग ॲप

COMMENTS