Homeताज्या बातम्या

मेंढपाळांसाठी चराई क्षेत्र अन् गुन्हे मागे घेण्याबाबत धोरण ठरणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील मेंढपाळांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मंत्रालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आ

जंतर-मंतर युवा आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध; बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
NEET ‘फेरपरीक्षेचा’ही पेपर फुटला? आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप; निष्पक्ष चौकशीची मागणी
तीन बिबट्यांची निघोज परिसरात दहशत; वनविभागाने त्वरित पिंजरे लावण्याची ग्रामस्थांची मागणी
मेंढपाळांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी धोरणात्मक निर्णय;चराई क्षेत्र अन्  गुन्हे मागे घेण्याबाबत धोरण - Marathi News | Mumbai Tarun Bharat

मुंबई: राज्यातील मेंढपाळांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मंत्रालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मेंढपाळांना चराऊ कुरण उपलब्ध करून देणे, त्यांच्या हक्कांसाठी समित्यांची नियुक्ती करणे, चराई पास आणि मेंढपाळांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत धोरण ठरविण्याच्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर, पशुसंवर्धन विभागाचे सचिव रामस्वामी आणि राज्यातील विविध भागांतून आलेले मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत मेंढपाळांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन अनेक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आले. मेंढपाळांच्या जनावरांसाठी चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. मेंढपाळांच्या समन्वयासाठी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी (SDO) समिती आणि ग्रामहक्क समिती तयार केली जाईल. या समित्यांनी कसे काम करावे, त्यांची कार्यपद्धती आणि अधिकार काय असावेत, याबाबत स्पष्ट नियमावली आणि मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील.

मेंढपाळांना रीतसर ‘चराई पास’ देण्यात यावा, तसेच त्यांच्यावर विनाकारण दाखल केलेले गुन्हे तीन महिन्यांच्या आत काढून टाकण्यात यावेत, असे नियोजन केले जाणार आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय (GR) निर्गमित केला जाईल. जे अधिकारी केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट पत्र काढण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले. या सर्व विषयांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी आणि अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येत्या मंगळवारी सर्व मंत्र्यांची विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

COMMENTS