बीड : केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा देशातील सर्वोच्च साहसी क्रीडा सन्मान, अर्थात ‘तेनजिंग नॉर्गे राष

बीड : केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा देशातील सर्वोच्च साहसी क्रीडा सन्मान, अर्थात ‘तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2025’साठी ऑनलाईन नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पात्र उमेदवारांनी दि. 20 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.
तरुणांमध्ये साहसी वृत्ती, जोखीम पत्करणे, सांघिक नेतृत्व आणि आव्हानात्मक परिस्थितीत प्रभावी निर्णय क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने दरवर्षी या राष्ट्रीय पुरस्कारांचे आयोजन केले जाते. अर्जुन पुरस्काराच्या समतुल्य दर्जा क्रीडा मंत्रालयाच्या माहितीनुसार, या पुरस्काराचा दर्जा क्रीडा क्षेत्रातील नामांकित अर्जुन पुरस्काराच्या समतुल्य मानला जातो. पुरस्कार विजेत्याला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केले जाते, ज्यामध्ये तेनजिंग नॉर्गे यांचा कांस्य पुतळा, सन्मानपत्र, विशेष ब्लेझर आणि तब्बल 15 लाख रुपये रोख पुरस्काराची रक्कम दिली जाते. चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये गौरव हा सर्वोच्च सन्मान प्रामुख्याने चार वेगवेगळ्या प्रकारच्या साहसी श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो या पुरस्कारासाठी केवळ भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत. जमीन, जल आणि हवाई साहस श्रेणींसाठी, निवड प्रक्रियेदरम्यान संबंधित उमेदवाराच्या मागील 3 कॅलेंडर वर्षांतील धाडसी कामगिरीचा प्रामुख्याने विचार केला जाईल. इच्छुक अर्जदारांना राज्य शासनाचा युवा व क्रीडा विभाग किंवा मान्यताप्राप्त अधिकृत साहसी संस्थांची शिफारस जोडणे आवश्यक आहे, तर सैन्य दलात ( लष्कर, नौदल, वायुसेना ) कार्यरत असलेल्या जवानांसाठी ही शिफारस अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाच्या ( हीींिीं://रुरीवी.र्सेीं.ळप ) या ऑनलाईन पोर्टलवर स्विकारण्यात येणार आहेत. अधिक माहिती व सविस्तर मार्गदर्शक तत्त्वांसाठी क्रीडा मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट देऊन दि.20 ऑगस्टपूर्वी नामांकन नोंदवावे, अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक सतीश राठोड (मो. 9923019353) यांच्याशी संपर्क साधता येईल. असेही कळविले आहे.

COMMENTS