बीड येथील राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अदिती दत्तात्रय बरकसे हिने सन 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती प

बीड येथील राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अदिती दत्तात्रय बरकसे हिने सन 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 7 वी) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अदितीच्या या यशाबद्दल विद्यालयात तिचा आणि तिचे पालक श्री. दत्तात्रय बरकसे यांचा मुख्याध्यापक श्री. सुरवसे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी अदितीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अदितीच्या यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासातील चिकाटी आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन असल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले. तिच्या या यशामुळे विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. कु. अदितीच्या या यशाबद्दल प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. सिराजोद्दीन देशमुख, सचिव मा. श्री. सुभाषचंद्रजी सारडा, तसेच मा. डॉ. अदितीताई सारडा आणि मा. डॉ. आदित्यभैय्या सारडा, संचालक, आदित्य एज्युकेशन ग्रुप, बीड यांनी तिचे विशेष कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS