नेकनूर: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ चा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील सर्व पात्र शेतक
नेकनूर: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ चा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील सर्व पात्र शेतकर्यांनी आपली केवायसी (KYC) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन नेकनूरचे उपसरपंच सचिन शिंदे यांनी केले आहे.
कर्जमाफीच्या लाभापासून परिसरातील कोणताही पात्र शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहू नये, यासाठी आधार प्रमाणीकरण (KYC) करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती सरकारने राज्यातील शेतकर्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ही कर्जमुक्ती योजना सुरू केली असून, पात्र शेतकर्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. मात्र, अनेक शेतकर्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकर्यांनी कोणतीही दिरंगाई न करता आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन सचिन शिंदे यांनी केले.
शेतकर्यांनी जवळच्या महा-ई-सेवा केंद्रावर किंवा ज्या बँकेतून पीक कर्ज घेतले आहे त्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड, बँक पासबुक व आवश्यक कागदपत्रांसह केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे. शासनाची ही योजना शेतकर्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र, केवळ केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये. नेकनूर व परिसरातील सर्व पात्र शेतकर्यांनी त्वरित आधार प्रमाणीकरण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसरपंच सचिन शिंदे यांनी केले आहे.

COMMENTS