Homeताज्या बातम्या

“मी रस्त्यावर संघर्ष करणारा नेता…”; राजीनाम्यानंतर संसदेत पोहोचलेल्या धर्मेंद्र प्रधान यांचा जयराम रमेश यांना सडेतोड टोला!

नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. 'नीट' (NEET) पेपर लीक प्रकरणातील विद्यार्थ्यांच्य

प्रेमसंबंधाला विरोध करत आईने ओढणीने आवळला १९ वर्षीय मुलीचा गळा; उल्हासनगरमधील धक्कादायक घटना
कुंभमेळ्याच्या २२७० कोटींच्या निधीमध्ये कोट्यवधींची लूट; मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमावी
मुंबईत मुसळधार पाऊस, तरीही टप्पा वाढीसाठी विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार कायम; आझाद मैदानावर तिसऱ्या दिवशीही ठिय्या
धर्मेंद्र प्रधान पुन्हा एक्शन मोडमध्ये, राजीनामा देताच... काँग्रेसचा बडा नेता टार्गेटवर

नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. ‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर ते आज प्रथमच संसदेत पोहोचले. यावेळी भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे भव्य स्वागत करत त्यांना सन्मानाने पगडी घालत संसद भवनात नेले. दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रधान यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असता, प्रधान यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले.

संसद भवन परिसरात काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी प्रधान यांच्याशी सहानुभूती व्यक्त करत, “असं होत असतं” असं म्हटलं. त्यावर धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ उत्तर दिलं, “काहीच झालेलं नाही.” त्यानंतर त्यांनी पुढे ठणकावून सांगितले की, “मी रस्त्यावर संघर्ष करणारा नेता आहे, एसी रूममध्ये बसून आंदोलन करणारा कार्यकर्ता नाही!” प्रधान यांच्या राजकीय भवितव्याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू असतानाच त्यांनी विरोधकांना हे थेट प्रत्युत्तर दिले आहे.

पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर आता धर्मेंद्र प्रधान यांना भाजप पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी त्यांच्याकडे प्रचार मोहिमेचे नेतृत्व सोपवले जाऊ शकते. प्रधान यांनी देशहितासाठी आपल्या पदाचा त्याग केल्याने जनतेत आणि त्यांच्या संबलपूर लोकसभा मतदारसंघात त्यांची प्रतिमा अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी ‘X’ वर पोस्ट केलेल्या निवेदनात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते की, “गेल्या दहा दिवसांत घडलेल्या घटनांमुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. भारताची युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद आहे. देशातील तरुणांना संभ्रमाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही, हा माझा दृढ निर्धार आहे.”

पक्षातील महत्त्वाचे योगदान

धर्मेंद्र प्रधान हे ओडिशातील भाजपचे आघाडीचे नेते असून राष्ट्रीय राजकारणात त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सुवेंदू अधिकारी यांच्या विजयातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

COMMENTS