Homeताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी एकजुटीचा विजय: राजेंद्र आमटे

बीड: नीट (NEET) परीक्षांमधील पेपर फुटीच्या प्रकारांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. याविर

“प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..”; विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज
देशाची शिक्षणव्यवस्था सत्ताधाऱ्यांनी नष्ट केली; खासदार राहुल गांधींचा भाजप सरकारवर हल्लाबोल
उपवर्गीकरणाविरोधातील लढा तीव्र; पनवेल ते चेंबूर ‘आरक्षण उपवर्गीकरणाची अंत्ययात्रा’

बीड: नीट (NEET) परीक्षांमधील पेपर फुटीच्या प्रकारांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. याविरोधात दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक यांनी उपोषण केले, तर अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली देशातील विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशातील विद्यार्थी एकवटले आणि सरकारच्या जनरेट्यापुढे झुकावे लागून अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा देशातील विद्यार्थी एकजुटीचा मोठा विजय असल्याची भावना राजेंद्र आमटे यांनी व्यक्त केली.

देशभक्त सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवस उपोषण करून एक नवा आदर्श निर्माण केला. तसेच, अभिजीत दीपके यांनी या आंदोलनाचे खंबीर नेतृत्व केले. आज देशात संपूर्ण विद्यार्थी आंदोलनाचा मुख्य चेहरा म्हणून सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांचे नेतृत्व सर्व विद्यार्थ्यांनी स्वीकारले असून हे दोघेही या आंदोलनाचे खऱ्या अर्थाने ‘हिरो’ ठरले आहेत.

जंतर मंतर मैदानावर सरकारने केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते मुंबई असा संपूर्ण देश एकवटला होता. धरणे, निदर्शने, मोर्चे व रॅलीच्या माध्यमातून सरकारवर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला. या विद्यार्थी शक्तीपुढे अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. या विजयानिमित्त बीडमध्ये विद्यार्थ्यांसोबत मोठा जल्लोष करण्यात आला. या प्रसंगी राजेंद्र आमटे, शेतकरी हक्क मोर्चाचे अभिषेक शिंदे, एसएफआयचे सुहास जयभये, डीवायएफचे किशोर पावले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS