Homeताज्या बातम्या

मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली दिपके कुटुंबियांची भेट; अभिजीत यांच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करणार

छत्रपती संभाजीनगर: वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका गैरव्यवहाराच्या विरोधात राजधानीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनात सक्रिय भूमिका बजाव

काळे गटाचे बिंग फुटले, आंदोलनाच्या नौटंकीचा डाव उधळला : उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा घणाघात
आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधातील आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा; राजू जोगदंड यांचे आवाहन
खा. बजरंग सोनवणेंकडून महामार्गाच्या कामाची पाहणी; रखडलेल्या कामांत घातले लक्ष
Sanjay Shirsat : “राजकीय पडसाद उमटू नये म्हणून…”; अभिजीत दिपकेंच्या  कुटुंबीयांची पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली भेट - Dainik Prabhat

छत्रपती संभाजीनगर: वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका गैरव्यवहाराच्या विरोधात राजधानीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनात सक्रिय भूमिका बजावणारे अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांची राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली. दिपके यांच्या आई-वडिलांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. अभिजीत यांच्या आंदोलनाचे कौतुक करत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाकडे पोलीस संरक्षणाची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. अशा तरुणाच्या पाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिजीत आपल्या मतदारसंघातील तरुण असल्याने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणे आवश्यक वाटल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, आंदोलन सुरू असताना त्यांनी जाणीवपूर्वक भेट घेतली नव्हती. त्या काळात भेट दिल्यास आंदोलनाला राजकीय स्वरूप दिले जात असल्याचा गैरसमज निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे परिस्थिती शांत झाल्यानंतरच त्यांनी कुटुंबियांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.

अभिजीत दिपके लवकरच महाराष्ट्रात परतणार असल्याचे सांगत शिरसाट यांनी त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. अभिजीत यांनी मोठा संघर्ष उभारला असून त्यांच्या जिव्‍हाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पोलीस संरक्षणाची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय शिरसाट यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने काही राजकीय पक्ष आणि नेत्यांनी स्वतःचा राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर उभ्या राहिलेल्या आंदोलनाचा काहींनी राजकीय फायद्यासाठी वापर केल्याचे ते म्हणाले. सरकारने आंदोलनाची दखल घेत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच या प्रश्नावर पुढील घडामोडी घडल्याचा दावाही त्यांनी केला.

COMMENTS