बीड: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती

बीड: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी आयोजित विभागीय एकदिवसीय कार्यशाळेत मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या ‘करिअर संसदे’ने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या करिअर विकासाला चालना देणे, रोजगाराच्या नव्या संधींची माहिती उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी करिअर नियोजन, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र, रोजगाराच्या संधी व बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातील आवश्यक कौशल्ये याविषयी सखोल मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी थेट संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमा दरम्यान महाविद्यालयाच्या करिअर संसदेचा ‘मुख्यमंत्री’ सय्यद रेहान अली खालेद अली याचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत रेहान अली, मोमीन अय्यान मोहम्मद इरफान, मोमीन आयान मोहम्मद बहाउद्दीन, सय्यद मुशायद मुस्तकीम, तसेच विद्यार्थिनी सय्यद मुस्कान आजम, शेख फातिमा युसूफ, सय्यद आयशा सय्यद आजम, शेख सदाफ एजाज, शेख सानिया फारूख, शेख फातिमा इम्तियाज, अलवान फाईजा रिजवान व सय्यद शिफा सय्यद मन्सूर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
याप्रसंगी करिअर कट्टा तालुका समन्वयक डॉ. मोहम्मद आसेफ इकबाल, महाविद्यालयीन समन्वयक डॉ. शेख हुसेन इमाम आणि डॉ. शामल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी सहभागासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS